काँग्रेसच्या सुदीप चाकोते यांच्या संपर्क कार्यालयाचे शानदार उद्घाटन ; महाविकास आघाडी नेत्यांची शुभेच्छाला गर्दी
सोलापूर : काँग्रेस पक्षाचे सेवा यंग ब्रिगेड सेलचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुदीप चाकोते यांच्या संपर्क कार्यालयाचे सोमवारी शानदार उद्घाटन झाले. सुदीप यांचे पिता मदन चाकोते यांच्या हस्ते या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे, माजी आमदार विश्वनाथ चाकोते, माजी स्थायी समिती सभापती बाबा मिस्त्री, युवक अध्यक्ष युवराज जाधव, अशोक कलशेट्टी यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी, चाकोते परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.
सुदीप चाकोते यांनी अतिशय भव्य असे कार्यालय थाटले आहे, मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम पार पडला. चाकोते यांना शुभेच्छा देण्यासाठी महिला काँग्रेसच्या शहराध्यक्ष प्रमिला तूपलवंडे, हेमा चिंचोळकर, वीणा देवकते, यांच्यासह त्यांच्या सहकारी कार्यकर्त्या उपस्थित होत्या.
शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांनी उपस्थिती लावून सुदीप यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी काँग्रेस नेते शौकत पठाण, एन के क्षीरसागर हे ही उपस्थित होते. त्यानंतर खरटमल यांनी कार्यालयाची पाहणी केली. कार्यकर्त्यांनी त्यांना चाकोते यांच्या खुर्चीवर बसण्याची विनंती केली असता त्यांनी नाकारली.
सिद्धेश्वर परिवाराचे प्रमुख धर्मराज काडादी यांनीही यावेळी सुदीप चाकोते यांना भेटून शुभेच्छा दिल्या. दक्षिण विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक झाल्याने काडादी हे सध्या सोलापूरच्या राजकारणात चर्चेचा विषय आहेत.