शिव -भीम सैनिकांच्या संरक्षणात असीम सरोदे, विश्वंभर चौधरी सोलापुरात कार्यक्रम स्थळी दाखल
लोकशाहीच्या रक्षणासाठी.. संविधानाच्या रक्षणासाठी… स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी, दडपशाहीच्या विरोधात उभे ठाकण्यासाठी,
वर्तमान परिस्थितीमध्ये निर्भय पणे जगण्यासाठी निर्भय बनो विचारपीठाच्या वतीने महाराष्ट्रभर विवेकाचा जागर मांडत आहेत.
रविवारी निर्भय बनो सभेचे आयोजन सोलापुरातील हेरिटेज मंगल कार्यालय या ठिकाणी करण्यात आले होते.
पुण्यात निखिल वागळे व असीम सरोदे यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सोलापुरात शिवसैनिक आणि भीमसैनिकांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून वाहनाला संरक्षण देत विश्वंभर चौधरी व असीम सरोदे यांना कार्यक्रम स्थळे आणले.
छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना अभिवादन करण्यात येऊन सर्व कार्यक्रम स्थळी आले. यावेळी शिवसेनेचे नेते पुरुषोत्तम बर्डे काँग्रेसचे माजी नगरसेवक विनोद भोसले, यांच्यासह शिवसैनिक भीमसैनिक मोठ्या संख्येने सोबत होते.