सोलापूर राष्ट्रवादीच्या सायरा शेख, लता ढेरे महिला प्रदेश सरचिटणीस तर शशिकला कस्पटे शहर समन्वयक
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंञी अजित पवार, प्रदेशाध्यक्ष खा.सुनील तटकरे, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्या आदेशानुसार महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर, यांच्या मान्यतेने सायरा शेख, लता ढेरे यांची प्रदेश सरचिटणीस तर शशिकला कस्पटे यांची शहर समन्वयक पदी निवड करण्यात आली.
या निवडीबद्दल शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी या तिन्ही महिला पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देताना अजित पवारांचे हात बळकट करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संघटन मजबूत करण्याचे आवाहन केले.
पक्ष संघटन वाढीसाठी व अजित पवारांचे हात बळकट करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करु अशी ग्वाही नूतन महिला प्रदेश सरचिटणीस सायरा शेख, लता ढेरे व शहर समन्वयक शशिकला कस्पटे यांनी दिली.