भारती विद्यापीठाच्या आर्यन महिंद्रकरचा जिल्हास्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक
सोलापूर : इंजिनीअर्स व प्रोफेशनल असोसिएशन तर्फे नुकत्याच घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय युवा स्पर्धेमध्ये भारती विद्यापीठ अंतर्गत अभिजीत कदम इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड सोशल सायन्सेस सोलापूर मधील बी. सी. ए. च्या आर्यन महिंद्रकर यांनी बी.जी.एम.आय या स्पर्धा प्रकारामध्ये जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक मिळवला.
इंजिनीअर्स व प्रोफेशनल असोसिएशन तर्फे दरवर्षी युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. या युवा महोत्सवांमध्ये विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले जाते. ज्यामध्ये मुख्यत्वे करून क्रिकेट, फुटबॉल, बॅडमिंटन, टेबल टेनिस, बी.जी.एम.आय अशा विविध स्पर्धांचा समावेश आहे. या युवा महोत्सवात सोलापुरातील विविध इंजीनियरिंग व व्यवस्थापनाशी निगडित इन्स्टिट्यूट मधील विद्यार्थी सहभाग नोंदवतात.
यावर्षी बी.जी.एम.आय या क्रीडा प्रकारात आर्यन महिंद्रकर याला जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक मिळाला. त्याच्या या यशाबद्दल इन्स्टिट्यूट चे संचालक प्रा. डॉ. एस. बी. सावंत यांनी कौतुक केले. आर्यन महिंद्रकर याचा यावेळी इन्स्टिट्यूट तर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी उपप्राचार्य डॉ. पी.पी. कोठारी एम.सी ए. विभाग प्रमुख डॉ. एम. केह पाटील एम. बी. ए. विभाग प्रमुख प्रा. सी. आर. सूर्यवंशी तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.