संघर्ष योद्धा अरुण क्षीरसागर यांचा सेवापुर्ती समारंभ उत्साहात साजरा ; कार्याचे झाले कौतुक
सोलापूर :- कास्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अरुण क्षीरसागर यांच्या सेवानिवृत्ती निमित्त आयोजित गुणगौरव समारंभ डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृहात उत्साहात संपन्न झाला. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांच्या हस्ते क्षीरसागर यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.
कास्ट्राईब संघटनेच्या वतीने अरुण क्षीरसागर यांना त्यांच्या आजवरच्या योगदानाबद्दल गौरव पत्र मनीषा आव्हाळे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. सदर प्रसंगी कल्याण श्रावस्ती संपादित “संघर्ष योद्धा अरुण क्षीरसागर”या गौरवअंकाचे प्रकाशन मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात छ. शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा पूजनाने व दिपप्रज्वलन करून झाली. याप्रसंगी स्मिता पाटील उपमुख्य कार्यकारी अधिकारी (प्रशासन) यांनी अरुणभाऊनी कास्ट्राईब संघटनेच्या माध्यमातून प्रशासनाशी सुसंवाद साधून मागासवर्गीय कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न सोडवले. सेवानिवृत्तीनंतरही त्यांनी सामाजिक कार्यात कार्यरत राहावे अशी अपेक्षा व्यक्त केली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष नामदेवराव कांबळे यांनी अरुण भाऊ हे सोलापूर जिल्ह्यातील कास्ट्राईबचा केंद्रबिंदू आहेत या शब्दात कार्याचे कौतुक केले. या कार्यक्रमात गणेश मडावी कार्याध्यक्ष कास्ट्राईब कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्य, सेवा निवृत्त पशुसंवर्धन सहा. आयुक्त डॉ . महेश बनसोडे, कास्ट्राईब महासंघाचे जिल्हाध्यक्ष मनीष सुरवसे, सोलापूर जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे यांनी अरुण भाऊंच्या कार्याचा आपल्या भाषणात गुणगौरव केला.
जी .एम मागासवर्गीय ग्रुपचे अध्यक्ष बाळासाहेब वाघमारे आणि पशुसंवर्धन अधिकारी डॉ. नवनाथ नरळे यांनी अरुण भाऊंचा विशेष सत्कार केला. सदर प्रसंगी जिल्हा परिषदेमधील विवेक लिंगराज, अविनाश गोडसे, राजेश देशपांडे, गिरीश जाधव या विविध कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षांनी आपली मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अरुण क्षीरसागर, गौरव समितीचे अध्यक्ष चंद्रकांत होळकर यांनी केले. उपाध्यक्ष उमाकांत राजगुरू यांनी आभार मानले. सूत्रसंचालन कल्याण श्रावस्ती यांनी केले.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी चंद्रकांत होळकर, संजय कांबळे, भगवान चव्हाण, उमाकांत राजगुरू, चेतन भोसले, नरसिंह गायकवाड, दिनेश बनसोडे, नागनाथ धोत्रे, मकरंद बनसोडे आदी संघटना पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमास कास्ट्राईब संघटनेचे तालुका पदाधिकारी, जिल्हा परिषदेमधील कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.