सोलापुरात राष्ट्रवादीच्या प्रमोद गायकवाड यांचा अर्ज मागे ; राम सातपुते यांच्यावर जोरदार टीका
सोलापूर : लोकसभा निवडणुकीच्या प्रक्रियेतील अर्ज माघार घेण्याच्या दिवशी सोलापूर लोकसभा मतदारसंघात सर्वांचे लक्ष लागलेल्या शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद गायकवाड यांनी आपला अपक्ष भरलेला अर्ज मागे घेतला. काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे तसेच माजी नगरसेवक विनोद भोसले यांच्यासोबत येऊन गायकवाड यांनी आपली माघार घेतली.
अर्ज माघार घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना गायकवाड म्हणाले, सध्या देशाचे संविधान धोक्यात आहे ते वाचवण्यासाठी आपण अर्ज माघार घेतला आहे, भाजपचे पहिले खासदार दारू पिण्यात गेले, दुसरे खासदार मठात बसण्यात गेले, तिसरा आता दिलेला उमेदवार शेतकऱ्याचा पोरगा म्हणून सांगतो आणि त्याचे वेगळेच उद्योग धंदे आहेत. अशापासून सोलापूरकरांनी सावधान राहावे आणि काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांच्यासोबत राहावे असे आवाहन केले.