सोलापूर – महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळ कार्यालय (सामाजिक न्याय भवन) सात रस्ता येथे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने दोघांना १५ रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे महिंद्र माने, पद जिल्हा व्यवस्थापक महात्मा फुले मागास विकास महामंडळ सोलापूर, महेश श्रीमंत बनसोडे पद कंत्राटी लिपिक सोलापूर असे लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.
यातील तक्रारदार यांची बहीण मूकबधिर असून त्यांनी कुक्कुटपालन व्यवसायासाठी महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळाकडे कर्ज प्रकरणासाठी अर्ज केला होता. त्यांना पाच लाख रुपये मंजूर झाले होते ते पाच लाख रुपये बँकेत वर्ग करण्यासाठी जिल्हा व्यवस्थापकासह कंत्राटी लिपिकाने वीस हजार रुपयाची मागणी केली होती तडजोडी अंती 15 हजार रुपये लाच देण्याचे ठरले.
ही लाच स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने दोघांना लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडल्याने आले असुन सदर बजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.