प्रकाश आंबेडकरांच्या ‘घोंचू मोदी’ शब्दाला अमर साबळे यांचे ही जोरदार उत्तर : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान मोदी यांना उद्देशून वापरलेल्या ‘घोंचू मोदी’ शब्दाला अमर साबळे यांनीही जोरदार उत्तर दिले आहे.
ऍड प्रकाश आंबेडकर यांनी इंडिया गाडीच्या नेत्यांना ट्विटर द्वारे एक मेसेज केला होता. त्यामध्ये त्यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घोंचू हा शब्द वापरला आहे त्यावर आता भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांमधून चांगलाच संताप व्यक्त करण्यात आला. भाजपचे माजी खासदार अमर साबळे यांनी प्रकाश आंबेडकर यांच्या त्या ट्विटला फेसबुकवरून उत्तर दिले आहे.
अमर साबळे यांनी फेसबुक वर काय दिले उत्तर :
प्रकाश आंबेडकर जी वारंवार काँग्रेसला पत्र लिहून त्यांना i n d i आघाडीत सामील होण्याची विनंती करताना पाहून मला खूप वाईट वाटले. काँग्रेसचे मंत्रीपद नाकारून आमचे मसिहा परमपूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी शिकवलेला स्वाभिमान काँग्रेसच्या पायावर गहाण टाकणे दुर्दैवी आहे.
माझे सरकार मनुस्मृतीवर नाही तर भीमस्मृतीवर चालेल असे आश्वासन देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गरीब कल्याण योजनेचा जास्तीत जास्त लाभ अनुसूचित जाती/जमातींना देण्याचा प्रयत्न केला आहे, प्रकाश आंबेडकरांचे वक्तव्य हे अशोभनीय असून त्याचा मी तीव्र निषेध करतो.