शिवजन्माच्या पाळणा सोहळ्यात आई तू जिजाऊ उपक्रम, 50 हजार महिलांची उपस्थिती राहणार ; सोलापूरच्या बैठकीत निर्धार
सोलापूर : यंदाच्या शिवजन्मोत्सव निमित्त 18 फेब्रुवारी रोजी रात्री बारा वाजता साजरा होणारा शिवजन्माचा पाळणा सोहळ्यात ‘आई तू जिजाऊ’ हा उपक्रम राबविला जाणार आहे. त्यावेळी पन्नास हजारपेक्षा अधिक महिलांची उपस्थिती राहावी यासाठी रविवारी झालेल्या बैठकीत नियोजन करण्यात आले.
शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाची बैठक शासकीय विश्रामगृहात संपन्न झाली. या बैठकीस मध्यवर्ती महामंडळाचे ट्रस्टी अध्यक्ष पदमाकर काळे, उत्सव अध्यक्ष सुभाष पवार, कार्याध्यक्ष रवी मोहीते, खजिनदार सी.ए. सुशिल बंदपट्टे, पुरुषोत्तम बरडे, राजन जाधव, माऊली पवार, विनोद भोसले, भाऊसाहेब रोङगे, प्रकाश ननवरे, दिनकर जगदाळे, सचिन स्वामी, देविदास घुले, वैभव गंगणे, बसवराज कोळी, लता फुटाणे, उज्वला साळुंखे, प्रा. संजीवनी साळुंखे, मनिषा नलावडे, जया रणदिवे, अश्विनी भोसले, प्रगती तिवारी, राधा पवार, चारुशिला जगदाळे, वैभवी पवार, मानसी मोरे, अँङ. दीपा भोसले, सुवर्णा यादव, कांचन काळे, सविता पवार, शितल मोरे, लक्ष्मी माने यांच्यासह शिवभक्तांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
बैठकीत आई तु जिजाऊ या उपक्रमावर मध्यवर्ती महामंडळाने विशेष भर दिला असून शिवजयंती मना-मनात शिवजयंती घरा-घरात साजरी होण्यासाठी प्रत्येकाने योगदान दयावे असे आवाहन मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
या कार्यक्रमास विशेष उपस्थिती तानाजी मालसुरे यांच्या वंशजातील शितल मालसुरे व त्यांचे चिरंजीव रायबा मालसुरे, सिंदखेड राजा राजामाता जिजाऊ यांचे सोळावे वंशज संगीताराजे शिवाजीराजे जाधववर, कोल्हापूरातील शिवव्याख्याते दिपक करपे त्याचसोबत पालिका आयुक्त शितल तेली -उगले, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे या देखील उपस्थित राहणार आहेत.