भाजप उमेदवार आमदार राम सातपुते यांनी घेतली टेक्सटाईल उद्योजकांची भेट ; कामगार वर्गाचा भरघोस पाठिंबा
सोलापुरातील उद्योजकांच्या अडचणी सोडविण्यास निश्चित प्राधान्य देऊ, असे आश्वासन भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी दिले. भाजप उमेदवार आमदार राम सातपुते यांनी गुरूवारी अक्कलकोट रोड एमआयडीसीतील उद्योजकांच्या भेटी घेतल्या.
यावेळी उद्योजक श्रीनिवास दायमा आणि प्रमोद दरगड यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा असलेले टॉवेल देऊन आमदार राम सातपुते यांचा सन्मान केला. याप्रसंगी उद्योजकांनी अक्कलकोट रोड एमआयडीसीतील अडचणी सांगितल्या. १९९६ नंतर या औद्योगीक वसाहतीत रस्ते झालेले नाहीत. सोलापूरच्या उद्योगासाठी १६ एमएलडी पाण्याची तरतूद आहे. यातील सात एमएलडी पाणी चिंचोळी एमआयडीसीला मिळते मात्र अक्कलकोट रोड एमआयडीसीला पुरेसा पाणीपुरवठा होत नाही. परिणामी, पाण्याची समस्या मोठ्या प्रमाणावर भेडसावत आहे. तसेच वीजपुरवठाबाबतही उद्योजकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
यावर आमदार सातपुते यांनी उद्योजकांना विस्तृत नियोजन आराखडा तयार करण्यास सांगितले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत बैठक लावून उद्योजकांच्या सर्व अडचणी सोडवू. त्याचबरोबर दर दोन महिन्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत लघुउद्योजकांची लावून त्यांच्या अडचणी सोडविणार असल्याचेही भाजपा उमेदवार आमदार राम सातपुते यांनी याप्रसंगी सांगितले.
यावेळी भाजपाचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे, जिल्हा सरचिटणीस मनीष देशमुख, उद्योजक आणि भाजपाचे शहर उपाध्यक्ष श्रीनिवास दायमा, श्रीनिवास दुबास, सदानंद कोडम, प्रमोद दरगड, सुनिल सारडा, गोविंद दायमा, अमित मादगुंडी, बालाजी बुरा, अंबादास बिंगी, निलेश फोफलिया, गिरीश फोफलिया, इंदिरा कुडक्याल आदी उपस्थित होते.
कामगार वर्गाचा भरघोस पाठिंबा
अक्कलकोट रोड एमआयडीसीतील कामगार वर्गाने भाजपाचे उमेदवार आमदार राम सातपुते यांना लोकसभा निवडणुकीसाठी भरघोस पाठिंबा देणार असल्याचे सांगितले. आमदार राम सातपुते यांची सोलापूरच्या सर्वांगीण विकासाची भूमिका कामगार वर्गाला पटली असून सोलापुरातील संपूर्ण कष्टकरी वर्ग आमदार राम सातपुते यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, असे कामगारांनी याप्रसंगी सांगितले.