“आम्ही साऱ्या प्रणिती ताई, एक नारी पडणार सब पे भारी” ; प्रणिती शिंदे यांची उमेदवारी जाहीर झाल्याबद्दल जल्लोष
सोलापूर राखीव लोकसभेसाठी आमदार प्रणिती शिंदे यांची काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर झाल्याबद्दल प्रभाग 15 च्या वतीने माजी नगरसेविका वैष्णवी अंबादास करगुळे यांच्या वतीने मिठाई वाटप करून जल्लोष करण्यात आला.
यावेळी करूणा नवगिरे, शातम्मा करगुळे, शांता जाधव, नागम्मा बेरे, अनिता भालेराव, संतोषी कोमोलु, प्रिया बज्जार, शंकुतला ठाकुर, फिलोमिना शिंदे, नम्रता शिंदे, वैशाली शिंदे, अजय अवलुर, देवा करगुळे, सागर अत्तरगी, पिंटु सगळे, अनिल मनलोर, भिम बज्जार आदी कोनापुरे चाळीतील महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
यावेळी बोलताना करगुळे म्हणाल्या, मागील एक महिन्यांपासून प्रणिती शिंदे या मतदारसंघात फिरत आहेत. त्यांच्या विरोधात भारतीय जनता पार्टीला उमेदवार भेटत नाही ही या मोठ्या पक्षासाठी शोकांतिका आहे, ताईंचे काम बोलते त्यामुळे ताई यंदा सोलापूरचा खासदार होणारच ही काळया दगडावरची रेघ आहे.