Breaking ! सोलापूर माढा मतदारसंघात 7 मे रोजी मतदान ;लोकसभा निवडणुकीची घोषणा ; महाराष्ट्रात 5 टप्प्यात मतदान, 4 जूनला निकाल
मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेऊन लोकसभा निवडणुकांचं वेळापत्रक जाहीर केलं. आठराव्या लोकसभेसाठी सात टप्प्यांत मतदान होईल.
19 एप्रिलला मतदानाचा पहिला टप्पा पार पडेल. दुसऱ्या टप्पा 26 एप्रिलला, तिसरा टप्पा 7 मे पार पडेल. चौथ्या टप्प्यासाठी 13 मे ला मतदान होईल तर पाचव्या टप्प्यातील मतदान 20 मे रोजी होईल. सहावा टप्प्यासाठी 25 मे आणि सातव्या टप्प्यासाठी 1 जून रोजी मतदान होईल.
मतमोजणी 4 जून रोजी होणार आहे. सतराव्या लोकसभेचा कालावधी 16 जूनला संपुष्टात येणार आहे. त्यापूर्वी नवीन लोकसभेच्या निवडीची प्रक्रिया पार पाडणे आवश्यक असल्याचं, राजीव कुमार यांनी पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट केलं. देशातील 96 कोटी मतदार यंदा मतदान करतील.त्यात शंभर वर्षांवरील मतदारांची संख्या 2 लाख आहे.
सात मे रोजी तिसऱ्या टप्प्यात होणाऱ्या अकरा मतदार संघाच्या मतदानामध्ये सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे.
निवडणुकीच्या घोषणेसोबतच देशात आचारसंहिता लागू झाल्याचंही कुमार यांनी जाहीर केलं. आचारसंहितेचा भंग केल्यास कठोर कारवाई केली जाईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
महाराष्ट्रात पाच टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. महाराष्ट्रात पाहिला टप्पा 11 एप्रिलला, 26 एप्रिल, 7 मे, 13 मे, पाचवा टप्प्यात 20 मे रोजी मतदान होईल.