Thursday, September 10, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापूरकरांनों हे आता नक्की वाचा ; जनतेच्या प्रश्नांना फुटली वाचा; निवडणुकीच्या तोंडावर रिक्षावरील बॅनर वेधताहेत लक्ष

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
13 March 2024
in political
0
सोलापूरकरांनों हे आता नक्की वाचा ; जनतेच्या प्रश्नांना फुटली वाचा; निवडणुकीच्या तोंडावर रिक्षावरील बॅनर वेधताहेत लक्ष
0
SHARES
398
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूरकरांनों हे आता नक्की वाचा ; जनतेच्या प्रश्नांना फुटली वाचा; निवडणुकीच्या तोंडावर रिक्षावरील बॅनर वेधताहेत लक्ष

सोलापूर, प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले असतानाच सोलापुरात मूलभूत प्रश्न निवडणुकीचे मुद्दे महत्वाचे ठरणार असल्याचे चित्र दिसून येत आहेत. शहरातील ऑटोरिक्षावरसध्या सोलापूरकरांच्या समस्यांचा पाढा वाचणारे बॅनर् झळकले असून शहर आणि जिल्ह्यात त्यांची जोरदार चर्चा रंगली आहे. रिक्षावरील या बॅनरबाजीमधून गेल्या अनेक वर्षांच्या सोलापूरच्या समस्यांचा मुद्दा चर्चेच्या केंद्रस्थानी आल्याचे चित्र दिसत आहे.

सोलापूर शहरातील बहुतांश रिक्षांवर आवाज सोलापूरचा या कॅम्पेनचे बॅनर्स दिसून येत आहेत. यावर सरकारच्या आश्वासनांची पोलखोल करणारी शेरेबाजी करत सोलापूरी जनतेच्या समस्यांना वाचा फोडण्यात आली आहे. आवाज सोलापूरचा ही मोहीम कोणाकडून राबवली जात आहे, याची माहिती समोर आली नसली तरीही सोलापूरचा पाणी प्रश्न, स्मार्टसिटी, विमानतळ, रस्ते, कचरा प्रश्न अशा विविध समस्यांवर अस्सल सोलापुरी भाषेतून लोकांच्या भावना मांडल्याने सोलापूर नागरिकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

गेली अनेक वर्षे सत्ताधाऱ्यांकडून सोलापूरच्या विकासाची स्वप्ने दाखविण्यात आली.मात्र स्मार्ट सिटी सारख्या योजनेला 8-9 वर्षे होऊन देखील सोलापूरकराच्या मुलभूत प्रश्नांची सोडवणूक झालेली नाही.आता लोकसभा निवडणूकीच्या तोंडावर सोलापूरच्या प्रश्नांवर आवाज उठवणारे बॅनर्स लागल्यामुळे राजकारणात सत्ताधाऱ्यांना आरसा दाखविण्याचा प्रयत्न या ऑटोरिक्षावरील बॅनर्समधून केलेला आहे.

गेली अनेकवर्षे सोलापूरकर विकासाच्या, स्मार्टसिटीच्या गप्पा ऐकत आहेत. मात्र,शहराचे प्रश्न ‘जैसे थे’ असल्याने त्याला या बॅनर्सद्वारे वाचा फोडण्याचा प्रयत्न केला आहे. सोलापूरचे नागरिक देखील सत्ताधाऱ्यांच्या नाकर्तेपणावर संताप व्यक्त करत आहेत. निवडणुका आल्या की रंगबिरंगी विकासाची स्वप्ने दाखवून मतांची झोळी भरणाऱ्या पुढाऱ्यांवर सोलापुरी जनता प्रचंड नाराज आहे. हायटेक शहराचे स्वप्न दाखवणाऱ्यांना साधा पाण्याचा प्रश्न सोडविता न आल्याचा रोष जनतेत आहे. त्यातच मनातला रोष थेट रिक्षावरील बॅनरवरून व्यक्त झाल्याने लोकांच्या मनात मोठे कुतुहूल निर्माण झाले आहे.

सोलापूरात आता निवडणुकीचा रंग भरला जात असताना, लोकांच्या प्रश्नांना पुन्हा केंद्रस्थानी आणून लोकांमध्ये जागृती करण्याचा प्रयत्न या लक्षवेधी रिक्षांनी केला आहे. त्यामुळे निवडणुकीत सोलापूरचा आवाज म्हणून समोर आलेला समस्यांचा पाढा कळीचा मुद्दा ठरणार आहे.

काय आहेत बॅनर्सवरचे मुद्दे ?

सोलापूर हुणार हुती स्मार्टसिटी, १० वर्ष दिली.. अजून थांबायच किती?
पैसा खाल्ला रस्त्यामदी, सोलापूर घातलं खड्ड्यामदी !
स्वच्छ सोलापूर स्वप्नातच राहिलं, कचऱ्याचं साम्राज्य सगळीकडं पाहिलं !
कोल्हापूरला नवीन विमानतळ, सोलापूरकरा, तू ट्रेनमागच पळ !
स्वप्न दाखवलं पुण्याचं, हितं पाणी नाय धुण्याचं !

ग्रामीण भागातही बॅनरबाजी

दरम्यान, ग्रामीण भागात देखील अशाच प्रकारचे शेती आणि महागाईशी निगडीत प्रश्न उपस्थित करणारे बॅनर्स सोलापूर मतदारसंघात गावोगावी लावण्यात आल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे गावकऱ्यांना त्यांच्या समस्यांना वाचा फोडणाऱ्या या बॅनरबाजीने कुतुहूल निर्माण झाले आहे. तसेच याबद्दल समाधानही व्यक्त करण्यात येत आहे. यामध्ये पिकाला नाही भाव, शेतकऱ्यांना नाही किंमत बळीराजा या सरकारला दाखव तुझी हिंमत अशा आशयच्या बॅनर्स लावून शेतकऱ्यांना आगामी निवडणुकीत आश्वासनांचे गाजर दाखवणाऱ्या विरोधात हिंमत दाखवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सध्या शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळत नाही. शेतीउत्पन्नाता खर्च दुप्पट झाला आहे. पिकाला पाणी देण्यासाठी धरणातून वेळेत पाणी उपलब्ध होत नाही, पाणी मिळाले तर वीजेचा तुटवडा यामुळे शेतकरी वर्ग मेटाकुटीला आला आहे. मात्र लोकप्रतिनिधींकडून ब्र शब्द काढला जात नाही. शेतकऱ्यांची हीच अडचण ओळखून आवाज सोलापूरच्या या कॅम्पेनच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधणारे बॅनर्स गावोगावी लावण्यात आले आहेत.

Tags: Loksabha election 2024Solapur loksabhaSolapur political
SendShareTweetSend
Previous Post

ब्रेकिंग :  उत्तर सोलापूरच्या तहसीलदार उज्वला सोरटे यांची केवळ 26 दिवसात बदली

Next Post

युवकांनों ग्रंथपाल कोर्स करायचा आहे का ; आजच प्रवेश घ्या ; शुक्रवार शेवटचा दिवस 

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
युवकांनों ग्रंथपाल कोर्स करायचा आहे का ; आजच प्रवेश घ्या ; शुक्रवार शेवटचा दिवस 

युवकांनों ग्रंथपाल कोर्स करायचा आहे का ; आजच प्रवेश घ्या ; शुक्रवार शेवटचा दिवस 

ताज्या बातम्या

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026
सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026
‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

17 August 2026

क्राईम

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

by प्रशांत कटारे
22 August 2026
0

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही सोलापुरातील वैभव वाघे खून खटल्याशी संबंधित सदर...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

1999552
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group