Monday, September 7, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

मंगळवेढा तालुक्यातील ३५ गावांच्या सिंचन योजनेस मंत्री मंडळाची मान्यता ; आमदार प्रणिती शिंदे यांच्या दबावामुळे शासनाचा निर्णय

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
13 March 2024
in political
0
मंगळवेढा तालुक्यातील ३५ गावांच्या सिंचन योजनेस मंत्री मंडळाची मान्यता ; आमदार प्रणिती शिंदे यांच्या दबावामुळे शासनाचा निर्णय
0
SHARES
142
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मंगळवेढा तालुक्यातील ३५ गावांच्या सिंचन योजनेस मंत्री मंडळाची मान्यता ; आमदार प्रणिती शिंदे यांच्या दबावामुळे शासनाचा निर्णय

सोलापूर : मंगळवेढाच्या 24 गावांचा सिंचन योजनेस आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मंजूरी मिळाली. आमदार प्रणिती शिंदे यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये हा प्रश्न लावून धरला होता व अधिवेशन संपल्यानंतर 24 गावांचा गाव भेट दौरा केला त्यामुळे शासनावर दबाव निर्माण झाल्यामुळे शासनास मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये तातडीने मंजूरी द्यावी लागली.

सोलापूर जिल्ह्यामधील मंगळवेढा तालुक्यातील खूपसंगी, लेंडवे चिंचळे, शिरशी गोणेवाडी, लक्ष्मी दहिवडी, आंधळगाव खडकी, जुनोनी, पाटकळ, येड्राव जित्ती, जाळीहाळ, हाजापुर सिद्धन्केरी, खवे भाळवणी, निंबोणी, रड्डे, गणेशवाडी हिवरगाव, मेटकरवाडी, शेलेवाडी, भोसे नंदेश्वर, हुन्नुर, मानेवाडी, पडोळकर, रेवेवाडी, महमदाबाद (हु) मारोळी, लवंगी, चिक्कलगी, सलगर बु,, सलगर खु,पौट, बावची, सोड्डी, शिवनगी, आसबेवाडी या दक्षिण भागातील 35 गावाच्या पाण्याचा प्रश्न गेली अनेक वर्षापासून पूर्णपणे सुटलेला नाही. या गांवामधील बहुतांश सरपंच, उपसरपंच यांनी आमदार प्रणिती शिंदे यांची भेट घेतली होती. हा प्रश्न 2009 च्या पूर्वी पासून लोकसभा व विधानसभा निवडणुकीतील कळीचा मुद्दा ठरलेला आहे. या तालुक्यातील 35 गावामधील 11 गावांना म्हैसाळ योजनेत समाविष्ट करण्यात आले आहे व आज काही प्रमाणात या गावांना म्हैसाळ योजनेचे पाणी मिळत आहे. उर्वरीत 24 गावासाठी उपसा सिंचन योजनेचा प्रस्ताव सादर करण्यात आलेला होता. या योजनेस प्रशासकीय मान्यता देखिल देण्यात आली. सध्याच्या काळात शेतीच्या व पिण्याच्या पाण्याची तिव्र समस्या निर्माण झालेली होती. यामुळे आमदार प्रणिती शिंदे यांनी हा प्रश्न अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये लावून धरलेला होता व शासनावर दबाव बनवून ठेवलेला होता. या प्रश्नावर शासनाकडून कोणतेही उत्तर न मिळाल्यामुळे आमदार प्रणिती शिंदे यांनी या 24 गावांचा गाव भेट दौरा केला व लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लावू व हा प्रश्न सुटेपर्यंत शेवटच्या क्षणापर्यंत आपण काम करत राहू असे आश्वासन गावकऱ्यांना दिले होते. या सर्व बाबी लक्षात आल्यानंतर शासनाने आज तात्काळ मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मंगळवेढ्यातील 35 गावांच्या सिंचन योजनेला मान्यता देण्याचा निर्णय घेतलेला आहे. मंगळवेढ्यातील या दुष्काळी भागातील गावामधून आमदार प्रणिती शिंदे यांचे आभार मानण्यात येत आहे.

मंगळवेढा तालुक्यातील दुष्काळी 35 गावांचा शेतीचे व पिण्याचा पाण्याचा प्रश्न गेली 40 वर्षापासून प्रलंबित होता 2009 पासून मंगळवेढा तालुक्यातील दक्षिण भागातील या गावांच्या पाणी प्रश्नासाठी संबंधित भागातील शेतकरी अतिशय आक्रमक झालेले आहेत तेव्हापासून हा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न व शेतीच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे 2014 मध्ये माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे व तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्विराज चव्हाण व तत्कालीन आमदार कै भारत भालके  यांनी राज्यपालाकडून विशेषबाब म्हणून मंगळवेढा तालुक्यातील उपसा सिंचन योजनेसाठी तत्त्वता मंजुरी घेतली त्यानंतर दुर्दैवाने सदर योजनेचा पाठपुरावा विरोधी सरकारमुळे पूर्ण होऊ शकला नाही सध्या तोच प्रश्न  आमदार प्रणिती शिंदे यांनी दिनांक 12 2 2024 रोजी मंगळवेढा काँग्रेस कार्यालय येथे दक्षिण भागातील 24 गावच्या सरपंचांबरोबर व प्रमुख पदाधिकाऱ्यांबरोबर पाण्याविषयी मीटिंग घेऊन पुढे होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये 24 गावाच्या व म्हैसाळच्या 18 गावाच्या पाण्याविषयी आवाज उठवला व लगेच मंगळवेढा तालुक्यातील 24 गावांमध्ये प्रत्यक्ष गाव भेटी देऊन त्या ठिकाणच्या लोकांबरोबर मी या लढ्यामध्ये तुमच्याबरोबर आहे असे आश्वासन देऊन सदरचा प्रश्न मी मार्गी लावण्यासाठी कायमस्वरूपी तुमच्याबरोबर आहे आणि मी या संदर्भात पाठपुरावा करणारच असे ठणकावून सांगितल्यानंतर सदरचा मेसेज विरोधी पक्षाला पोचल्यामुळे आणि काँग्रेसच्या आक्रमकतेमुळे विरोधी पक्षाला नमते घेऊन आज झालेल्या मंत्रिमंडळामध्ये त्यांना सदरच्या 24 गावाच्या उपसा सिंचन योजनेस मंजुरी देण्यासाठी भाग पाडले. सदरच्या 24 गावाच्या उपसा सिंचन योजनेसाठी शासनाने मंत्रिमंडळामध्ये मंजुरी दिल्याबद्दल मंगळवेढा तालुक्यातील 24 गावच्या जनतेच्या वतीने मी शासनाचे आभारी आहे व भविष्यात शासनाने सदर प्रकल्प योजनेस कालावधी ठरवून देऊन त्वरित निधी उपलब्ध करून द्यावा अन्यथा मी सदरच्या निधीसाठी पाठपुरावा करण्यासाठी जनतेतून उठाव करणार आहे.

Tags: Loksabha election 2024MangalwedhaMLA praniti Shinde
SendShareTweetSend
Previous Post

चिंचोली एमआयडीसीत गॅस स्फोटात विलास पवार यांचे घर बेचिराग ; माजी नगरसेविका राजश्री चव्हाण यांचे जिल्हाधिकारी यांना निवेदन

Next Post

इंगळगीच्या सरपंचपदी भाजपचे विनोद बनसोडे ; आ. सुभाष देशमुख गटाची सत्ता कायम

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
इंगळगीच्या सरपंचपदी भाजपचे विनोद बनसोडे ; आ. सुभाष देशमुख गटाची सत्ता कायम

इंगळगीच्या सरपंचपदी भाजपचे विनोद बनसोडे ; आ. सुभाष देशमुख गटाची सत्ता कायम

ताज्या बातम्या

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026
सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026
‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

17 August 2026
सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

11 August 2026
सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

10 August 2026

क्राईम

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

by प्रशांत कटारे
22 August 2026
0

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही सोलापुरातील वैभव वाघे खून खटल्याशी संबंधित सदर...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

1998903
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group