Sunday, September 6, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सीईओ मनिषा आव्हाळे यांच्यावर जेसीबीतून पुष्पवृष्टी.., बग्गीतून काढली मिरवणूक ; कुठे झाला हा अनोखा सन्मान

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
9 March 2024
in solapur
0
सीईओ मनिषा आव्हाळे यांच्यावर जेसीबीतून पुष्पवृष्टी.., बग्गीतून काढली मिरवणूक ; कुठे झाला हा अनोखा सन्मान
0
SHARES
1.7k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सीईओ मनिषा आव्हाळे यांच्यावर जेसीबीतून पुष्पवृष्टी.., बग्गीतून काढली मिरवणूक ; कुठे झाला हा अनोखा सन्मान

रस्त्याच्या दुतर्फा गावातील महिलांची शिस्तबद्ध रांग, प्रत्येकाच्या हातात रंगीबेरंगी फुले,पारंपारिक वाद्यांचा कडकडाट,फटाक्यांची आतषबाजी अन् मिरवणुकीत सहभागी प्रत्येक ग्रामस्थांच्या चेहऱ्यावरचा आनंद..!या प्रसन्न वातावरणात प्रशासनातील एखाद्या अधिकाऱ्याचा नागरी सन्मान होणे म्हणजे नशिबच म्हणावे लागेल.हे भाग्य मिळाले ते सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा अव्हाळे यांना…!बग्गीतुन मिरवणुक व जेसीबीतुन मुक्त फुलांची उधळण करत चपळगांव ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी अव्हाळे यांचा जागतिक महिला दिनानिमित्त नागरी सन्मान केला.

जागतिक महिला दिन आणि महाशिवरात्रीच्या निमित्ताने सोलापूर जिल्ह्यातील विविध भागात वेगवेगळे कार्यक्रम सुरू असताना चपळगाव ता.अक्कलकोट येथील ग्रामस्थांनी अनोख्या पद्धतीने महिला दिन साजरा केला व संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधून घेतले.आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सरपंच वर्षा भंडारकवठे होत्या तर व्यासपीठावर सेवानिवृत्त अंगणवाडी पर्यवेक्षिका सुनंदा राजेगावकर, प्रा.डॉ.शिला स्वामी, रिणाती संस्थेच्या सचिवा रोहिणी पाटील, ग्रा.पं.सदस्या रेश्मा तांबोळी, वंदना कांबळे, वर्षा सोनार, चित्रकला कांबळे, गंगाबाई वाले, डॉ.लता रणखांबे, शोभा गजधाने, कोंडाबाई कांबळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

http://sinhasan.co.in/wp-content/uploads/2024/03/VID-20240309-WA0058.mp4

प्रारंभी कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व प्रार्थना घेण्यात आली.

दरम्यान महिला दिनानिमित्त एखाद्या खेडेगावात नागरी सन्मान होणे मोलाचे आहे. परंतु चपळगाव वासियांनी आपल्याच गावातील लेक मोठ्या हुद्द्यावर गेली आहे व तिचा नागरी सन्मान करणे हे प्रत्येकाचं कर्तव्य समजून गावातून मिरवणूक काढून माझा सन्मान केला हे मी माझे भाग्य समजते.आपल्या घरातील मुलींना प्रत्येक आई-वडिलांनी बळ देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. मुलींनीही इतरांपेक्षा वेगळी स्वप्ने पाहिली पाहिजेत व ती पूर्ण करण्यासाठी जिद्द व चिकाटी ठेवून स्वप्न साध्य केले पाहिजे.यासाठी कष्टाची तयारी असावी. पालकांनी आपल्या मुलींना त्यांची स्वप्ने साध्य करण्यासाठी शिस्तीची जोड घेऊन स्वातंत्र्य दिले पाहिजे असे आवाहन सीईओ आव्हाळे यांनी केले.

कार्यक्रमासाठी विस्तार अधिकारी पंचायतचे युसुफ पठाण, तालुका वैद्यकीय अधिकारी आश्विन करजखेडे, आरोग्य विस्तार अधिकारी महेश भोरे, ग्रामसेवक सोमलिंग कणगी, परमेश्वर बिराजदार, श्रीधर नडीमेटला, डॉ.मनिष उमरिणीकर, पोलिस पाटील विवेकानंद हिरेमठ, आरोग्य केंद्रातील आरोग्य सेवक-सेविका, आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका-मदतनीस, जिल्हा परिषद शाळेचे कर्मचारी, बचत गटाचे सदस्य व चपळगाव, बावकरवाडीतील महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: AkkalkotCEO Manisha Awhaleचपळगाव
SendShareTweetSend
Previous Post

आ. विजयकुमार देशमुख व महेश कोठे समर्थकांमध्ये हाणामारी ; दोन्ही नेते पोलीस ठाण्यात ठाण मांडून, काँग्रेसचे चेतन नरोटे कोठेंच्या मदतीला धावून

Next Post

सोलापुरात डॉ पतंगराव कदम यांना पुण्यतिथीनिमित्त संकुलात अभिवादन

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
सोलापुरात डॉ पतंगराव कदम यांना पुण्यतिथीनिमित्त संकुलात अभिवादन

सोलापुरात डॉ पतंगराव कदम यांना पुण्यतिथीनिमित्त संकुलात अभिवादन

ताज्या बातम्या

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026
सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026
‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

17 August 2026
सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

11 August 2026
सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

10 August 2026
अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

10 August 2026

क्राईम

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

by प्रशांत कटारे
22 August 2026
0

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही सोलापुरातील वैभव वाघे खून खटल्याशी संबंधित सदर...

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

by प्रशांत कटारे
11 August 2026
0

oplus_2 oplus_2 सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले! सोलापूर : कुमठा...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

1998520
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group