Monday, August 31, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

महिला सरपंचांनो, शासनाच्या योजना राबविण्यासाठी तुम्ही पुढाकार घ्या; आम्ही पाठीशी आहोतच! सीईओ मनिषा आव्हाळे यांचा महिला सरपंचांना दिलासा

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
5 March 2024
in solapur
0
महिला सरपंचांनो, शासनाच्या योजना राबविण्यासाठी तुम्ही पुढाकार घ्या; आम्ही पाठीशी आहोतच! सीईओ मनिषा आव्हाळे यांचा महिला सरपंचांना दिलासा
0
SHARES
107
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

महिला सरपंचांनो, शासनाच्या योजना राबविण्यासाठी तुम्ही पुढाकार घ्या; आम्ही पाठीशी आहोतच! सीईओ मनिषा आव्हाळे यांचा महिला सरपंचांना दिलासा

सोलापूर : शासनाकडून येणार्‍या नवनव्या योजनांची आपल्या गावात प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी महिला सरपंचांनी पुढाकार घ्यावा आणि आपल्या सरपंचपदाच्या मिळालेल्या संधीतून गावांचा विकास साधावा, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांनी केले.

दरम्यान, या सरपंचांनी ग्रामीण भागातील प्रत्येक घटकांच्या विकासासाठी प्रयत्न केला तर काहीही अशक्य नाही, तुम्ही लढातर आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, असाही सल्ला सीईओ आव्हाळे यांनी दिला.

मुख्य कार्यकारी अधिकारी आव्हाळे यांच्या संकल्पनेतून आज दि. 5 मार्च रोजी महिला सरपंच कार्यशाळा येथील हुतात्मा स्मृती मंदिर येथे संपन्न झाली. सदर कार्यशाळेचे उद्घाटन आमदार सुभाष देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी जिल्हास्तरीय खाते प्रमुख इशाधीन शेळकंदे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत अमोल जाधव, प्रकल्प संचालक जल जीवन मिशन प्रसाद मिरकले, जिल्हा कार्यक्रम अधिकारी तसेच तालुका स्तरावरील गटविकास अधिकारी सदर कार्यशाळेस उपस्थित होते.

तसेच सदर कार्यशाळेवेळी फलटनचे ग्रामसेवक प्रकाश कळसकर, यांनी मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 मासिक सभा ग्रामसभा कर्तव्य याबाबत मार्गदर्शन केले. निवृत्त लेखाधिकारी झहीर सय्यद यांनी ग्रामपंचायत लेखा संहिता अधिनियम 2011, मोटिवेशनल स्पीकर सुभाष रणदिवे यांनी मानवी दृष्टिकोन, अ‍ॅड. सुवर्णा कोकरे यांनी पोकसा कायदा बाबत माहिती दिली.

धाराशिव येथील संवाद तज्ज्ञ रमाकांत गायकवाड यांनी महिला बचत गट व उमेद अभियान तसेच सेवानिवृत्त अंगणवाडी पर्यवेक्षिका यांनी शाश्‍वत विकासाची उद्दिष्टे व भूमिका याबाबत बहुमूल्य मार्गदर्शन केले. सदर कार्यशाळेसाठी जिल्ह्यातून 585 महिला सरपंच कार्यशाळेसाठी उपस्थित होते. आलेल्या पाहुण्यांनी ग्रामीण विकासाचा गाडा, त्यांच्या येणार्‍या अडीअडचणींचे मार्गदर्शन या कार्यशाळेत केले. यावेळी आ. सुभाष देशमुख यांनी महिला सरपंचांना मार्गदर्शन करताना जिल्ह्यातील विविध योजनांची सविस्तर माहिती दिली.

Tags: CEO Manisha Awhaleमहिला सरपंच कार्यशाळासोलापूर जिल्हा परिषद
SendShareTweetSend
Previous Post

महादेव कोगणुरे यांनी बांधली शेतकऱ्यांची मोट ; 5000 शेतकरी आणि 500 महिलांना कायमस्वरूपी रोजगार मिळण्यासाठी रोल मॉडेल उभा करणार

Next Post

माध्यमिक शिक्षण विभागाचे आवक -जावक रजिस्टर आता ऑनलाईन  ; शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी घेतला निर्णय, विभागात बरेच बदल होणार

प्रशांत कटारे

ताज्या बातम्या

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026
सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026
‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

17 August 2026
सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

11 August 2026
सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

10 August 2026
अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

10 August 2026
ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

9 August 2026

क्राईम

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

by प्रशांत कटारे
22 August 2026
0

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही सोलापुरातील वैभव वाघे खून खटल्याशी संबंधित सदर...

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

by प्रशांत कटारे
11 August 2026
0

oplus_2 oplus_2 सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले! सोलापूर : कुमठा...

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

by प्रशांत कटारे
10 August 2026
0

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल परिस्थितीजन्य पुरावा आधारीत खटला शाबितीसाठी परिस्थितीजन्य पुराव्याची...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

Our Visitor

1998203
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group