Monday, August 31, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

आता प्रत्येक गावाच्या विकासाचा निर्देशांक ठरणार ; सोलापूर जिल्हा परिषदेने केले नियोजन

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
28 February 2024
in solapur
0
सोलापूर जिल्ह्यातील हे आहेत दोन वर्षाचे आदर्श ग्रामसेवक ; पंढरपुरात शुक्रवारी पालकमंत्री करणार गौरव, ही आहेत जिल्ह्यातील सुंदर गावे
0
SHARES
604
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

आता प्रत्येक गावाच्या विकासाचा निर्देशांक ठरणार ; सोलापूर जिल्हा परिषदेने केले नियोजन

केंद्रीय मंत्रालय, राज्य सरकारचे विभाग, निती आयोग आणि पंचायती राज संस्थांचा समावेश असलेल्या शाश्वत विकास उद्दिष्टांच्या स्थानिकीकरणाच्या प्रक्रियेत पंचायत राज मंत्रालयाने नेतृत्वाची भूमिका घेऊन प्रत्येक गावचा पंचायत विकास निर्देशांक (पीडीआय) तयार करण्याचे निश्चित केल्याने गावे विकासाच्या कोणत्या टप्यावर आहेत, हे पाहून त्यांना विकासाचा प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करणार अशी माहिती मनिषा आव्हाळे, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांनी दिली.

यापूर्वी विकासाचा निर्देशांक जिल्हापातळीपर्यंत पाहिला जायचा. आता गावपातळीवरचा सुद्धा विकास निर्देशांक पाहिला जाणार आहे. ग्रामपंचायतींच्या प्रगतीचे मोजमाप करण्यासाठी पंचायत विकास निर्देशांक हे एक बहुआयामी साधन असेल. निर्देशांक २०२३- २४ साठी ग्रामपंचायतींचा पंचायत विकास निर्देशांक तयार केला जाणार असून, ग्रामपंचायतींनी पीडी आय पोर्टलवर रजिस्ट्रेशन करायचे आहे. पीडीआय संकेतस्थळावर

२०२२- २३ या आर्थिक वर्षातील आधारभूत माहिती ऑनलाईन भरायची आहे. प्रत्येक गावात कृषी, पशुसंवर्धन, सांख्यिकी, नियोजन, बँका, शिक्षण, वन, आरोग्य, गृह, अन्न व नागरी पुरवठा, पाणी पुरवठा व स्वच्छता, ग्रामविकास, महसूल, राष्ट्रीय ग्रामीण जवन्नोनती अभियान, महिला व बाल विकास, अशा १५ विभागांचा किती सहभाग आहे, पाहिले जाईल. त्यात पॉझिटिव्ह, निगेटिव्ह माहिती असेल. या माहितीवरून प्रत्येक ग्रामपंचायतीचे गुणांकन ठरेल.

गुणांकन ० ते ४०, ४१ ते ६०, ६१ ते ७५, ७६ ते ९० व ९० असे असेल. या निर्देशांकावरून संबंधित गावास कोणती कामे, उपक्रम राबवायचे, शिवाय बलस्थानेही स्पष्ट करायची आहेत. ग्रामपंचायतींचा शाश्वत विकास स्थानिकीकरण संदर्भातील २०२३- २४ मध्ये तयार होणारा पंचायत विकास निर्देशांक हा पायाभूत माहिती म्हणून वापरला जाणार आहे. निर्देशांकाच्या अंमलबजावणीस राज्य, जिल्हा, उपविभाग व तालुका स्तरावर प्रमाणिकरण व ग्रामपंचायत स्तर येथे अंमलबजावणी समिती स्थापन करून हे काम केले जाणार आहे.

जिल्हास्तरावर समिती

जिल्हास्तरावर माहितीचे सनियंत्रण व प्रमाणिकरण करण्यासाठी मा. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती आहे. या समितीचे सचिव म्हणून जि. प.चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पं.) काम पाहतील. समितीत इतर २५ सदस्य असतील. तसेच जिल्हास्तरावर माहिती प्रमाणिकरण समितीही असेल. उपविभाग, तालुका, ग्रामपंचायत स्तरावर देखील समित्या गठीत केल्या आहेत. माहिती संकलन नेमके कसे करायचे याचे निर्देश शासन निर्णयात दिले आहेत.

सोलापूर जिल्हयात काम सुरू

या संदर्भात पंढरपूर येथे राज्य समन्वयक अंकुश बगाडे यांनी सर्व ग्रामपंचायतीना माहिती डाऊनलोड कशी करावे व सर्व विभागकडून माहिती एकत्रीत करून संकेतस्थळावर भरणेबाबत मार्गदर्शन केले. तसेच 15 मार्च पूर्वी सदर कामे तातडीने पूर्ण करणेबाबत सर्व ग्रामपंचायतीना सुचना देण्यात आले आहे.

Tags: CEO Manisha AwhaleSolapur zpZilha parishad solapur
SendShareTweetSend
Previous Post

आमदार सुभाष देशमुख, सचिन कल्याणशेट्टी भाजप निरीक्षकांच्या यादीत ; आमदार विजयकुमार देशमुखांचे नाव नाही ; कूछ तो गडबड है दया…

Next Post

काँग्रेस वाट पाहतो जिल्हाध्यक्षांची ; प्रदेशाध्यक्षांना गांभीर्य नाही का? सोलापुरात कार्यकर्ते करू लागले चर्चा

प्रशांत कटारे

ताज्या बातम्या

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026
सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026
‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

17 August 2026
सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

11 August 2026
सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

10 August 2026
अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

10 August 2026
ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

9 August 2026

क्राईम

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

by प्रशांत कटारे
22 August 2026
0

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही सोलापुरातील वैभव वाघे खून खटल्याशी संबंधित सदर...

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

by प्रशांत कटारे
11 August 2026
0

oplus_2 oplus_2 सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले! सोलापूर : कुमठा...

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

by प्रशांत कटारे
10 August 2026
0

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल परिस्थितीजन्य पुरावा आधारीत खटला शाबितीसाठी परिस्थितीजन्य पुराव्याची...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

Our Visitor

1998234
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group