Sunday, September 6, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

केंद्रीय कायदामंत्री अर्जुनराम मेघवाल मंगळवारी सोलापुरात

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
26 February 2024
in solapur, Social
0
केंद्रीय कायदामंत्री अर्जुनराम मेघवाल मंगळवारी सोलापुरात
0
SHARES
21
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

केंद्रीय कायदामंत्री अर्जुनराम मेघवाल मंगळवारी सोलापुरात

सोलापूर :  केंद्रीय कायदामंत्री अर्जुनराम मेघवाल यांच्या उपस्थितीत मंगळवारी सायंकाळी ६ वाजता सम्राट चौकातील महेश गार्डन येथे मारवाडी समाज संमेलनाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती संयोजक आणि भाजपाचे शहर उपाध्यक्ष श्रीनिवास दायमा यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली.

याप्रसंगी भारतीय जनता पक्षाचे माजी राष्ट्रीय उपाध्यक्ष श्याम जाजू यांची प्रमुख उपस्थिती असेल. या कार्यक्रमात केंद्रीय कायदामंत्री अर्जुनराम मेघवाल यांचा सोलापुरातील सर्व राजस्थानी संस्थांतर्फे नागरी सन्मान करण्यात येणार आहे. त्याचबरोबर समाजातील उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींना पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. ज्येष्ठ समाजसेवक ब्रिजमोहन फोफलिया आणि उद्योगवर्धिनी संस्थेच्या अध्यक्षा चंद्रिका चौहान यांचा मारवाडी समाजरत्न पुरस्काराने गौरव करण्यात येणार आहे. तसेच हर्षद कांकरिया, मनीष मेहता, विशाल वर्मा, अनिल पटवारी, जगदीश भुतडा, लक्ष्मीकांत तापडिया, गोपाल दायमा, कृष्णकांत दायमा यांचा मारवाडी युवा उद्योगरत्न पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या १० वर्षांच्या कार्यकाळात देशात झालेले बदल आणि मोदींची गॅरंटी’ या विषयावर केंद्रीय कायदेमंत्री अर्जुनराम मेघवाल सोलापूरकरांना मार्गदर्शन करणार आहेत. त्याचबरोबर श्री. मेघवाल हे ग्रामदैवत श्री सिध्दरामेश्वरांचे दर्शन घेणार असून सोलापूरच्या चार हुतात्म्यांना अभिवादनही करणार आहेत.

महेश गार्डन येथील कार्यक्रमास सोलापूरकरांनी उपस्थित रहावे, असे आवाहन श्रीनिवास दायमा यांनी याप्रसंगी केले. या पत्रकार परिषदेस उद्योजक बाबूभाई मेहता, शहर भाजपाचे कोषाध्यक्ष चंद्रकांत तापडिया, हर्षल कोठारी, कल्पेश मालू, अनुपम खंडेलवाल, राकेश सोनी, आनंद शर्मा, विक्रम संकलेचा उपस्थित होते.

Tags: @Solapur_visitArjun meghwalBJPMarwadi community
SendShareTweetSend
Previous Post

देवेंद्र फडणवीस यांच्यावरील बिनबुडाचे आरोप मान्य नाहीत ; आशिष शेलार यांनी जरांगे पाटलांना घेतले फैलावर

Next Post

सचिन कल्याणशेट्टी व दत्तात्रय भरणे यांचे आभार मानावे तितके कमीच ; आनंद चंदनशिवे असे का म्हणाले

प्रशांत कटारे

ताज्या बातम्या

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026
सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026
‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

17 August 2026
सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

11 August 2026
सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

10 August 2026
अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

10 August 2026

क्राईम

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

by प्रशांत कटारे
22 August 2026
0

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही सोलापुरातील वैभव वाघे खून खटल्याशी संबंधित सदर...

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

by प्रशांत कटारे
11 August 2026
0

oplus_2 oplus_2 सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले! सोलापूर : कुमठा...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

1998518
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group