सोलापूर : पुलवामा जवानांचे बळी घेऊन राजकीय फायदा उचलणाऱ्या मोदी सरकारचा व सत्यपाल मालिक यांना आरएसएसचे राम माधव यांनी 300 कोटीची केलेली लाचेची ऑफर, तसेच देशातील भ्रष्टाचाराच्या निषेधार्थ सोमवारी देशभरात काँग्रेस रस्त्यावर उतरल्याचे पाहायला मिळालं.
सोलापुरात शहराध्यक्ष चेतन नरोटे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस भवन येथून पायी चालत काँग्रेस कार्यकर्ते जिल्हा परिषदेच्या पूनम गेट समोर आले त्या ठिकाणी शर्म करो मोदी ! शर्म करो या शब्दात जोरदार घोषणाबाजी केली, प्रसिद्धीप्रमुख तिरुपती परकीपंडला यांनी घोषणा दिल्या, त्यांच्या मागे काँग्रेस कार्यकर्त्यांनी घोषणा दिल्या.
यावेळी अध्यक्ष नरोटे यांनी मोदी सरकारच्या धोरणांवर टीका केली. पुलवामा घटनेत शहीद झालेल्या जवानांच्या नावाने मतदान मागितले परंतु त्या जवानांना किती मदत केली? त्या घटनेत एवढे आरडीएक्स कुठून आले? माजी राज्यपाल सत्यपाल मालिक यांनी केलेले आरोप याचे उत्तर केंद्रातील मोदी सरकारने द्यावे, अन्यथा आपल्या पंतप्रधानपदाचा राजीनामा द्यावा अशी जोरदार मागणी त्यांनी केली.
या आंदोलनात सेवादल यंग ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष सुदीप चाकोते, कार्याध्यक्ष संजय हेमगड्डी, युवक अध्यक्ष गणेश डोंगरे, महिला अध्यक्ष हेमा चिंचोळकर, माजी नगरसेवक विनोद भोसले, सरचिटणीस श्रीशैल रणधीरे, युवराज जाधव, हाजीमलंग नदाफ, प्रमिला तूपलवंडे, भीमाशंकर टेकाळे, हनुमंतू सायबोळू, मनीष गडदे, केशव इंगळे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

















