सोलापूर : राज्याचे माजी उपमुख्यमंत्री, विरोधी पक्ष नेते अजित पवार हे महाविकास आघाडीला मोठा धक्का देणार असल्याचे चर्चा राज्याच्या वर्तुळात ऐकण्यास मिळत आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या तब्बल 40 आमदारांसह ते भारतीय जनता पार्टी सोबत सत्ता स्थापन करणार असल्याचे बोलले जात आहे. तशा घडामोडींना वेग आल्याने राजकारणात खळबळ उडाली आहे.
याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील हे मंगळवारी जिल्हा परिषदेमध्ये आले असता पत्रकारांनी त्यांना घेराव घातला या विषयावर त्यांची प्रतिक्रिया घेतली असता, हे सर्व तर्कवितर्क काढले जात आहेत. महाविकास आघाडी भक्कम आहे. या आघाडीला तोडण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक केला जात आहे. अजित पवार हे आमचे नेते आहेत ते राष्ट्रवादीतच राहणार असून या सर्व बातम्या मध्ये कोणतेही तथ्य नाही. अजित पवार हे जे करायचं असतं ते उघडपणे करतात अशी भाषा पाटील यांनी वापरली. दरम्यान उमेश पाटील नक्की काय म्हणाले पहा हा व्हिडिओ

















