जिल्हा परिषद सोलापूर मुख्यालय पंचायत समिती दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर अंतर्गत काम करणाऱ्या 11 खाजगी कंत्राटी मुस्लिम सुरक्षारक्षक व स्वच्छता कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषद कर्मचारी युनियन यांच्या वतीने कपडे, साडी, ईद साहित्य, व रोख रक्कम अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर व अजयसिंह पवार मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांच्या हस्ते देऊन रमजान ईदच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
याप्रसंगी राज्य सरचिटणीस विवेक लिंगराज, विभागीय संघटक पुणे विभाग डॉ. एस ,पी, माने, चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष श्रीशैल देशमुख, युनियन सचिव विलास मसलकर, मुख्य संघटक संतोष शिंदे, राजीव गाडेकर आदी उपस्थित होते .



















