सोलापूर : शहरात सर्वत्र रमजान सणाचा उत्साह पाहायला मिळतोय, केवळ दोन दिवसावर रमजान आल्याने रोजा इफ्तार पार्टी सुद्धा जोरात दिसत आहेत. हिंदू मुस्लिम बांधव एकमेकांना निमंत्रण देऊन जातीय सलोख्याचे महत्त्व वाढवत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख माजी विरोधी पक्ष नेते अमोल शिंदे यांनी आपल्या पंजाब तालीम भागात रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते.
या कार्यक्रमाला त्यांनी एमआयएम नेते फारूक शाब्दी यांना आमंत्रित केले होते. शाब्दी यांनी उपस्थिती लावून या कार्यक्रमाचा उत्साह वाढवला. यावेळी संकेत पिसे, मतीन बागवान, तुकाराम मस्के यांच्यासह या भागातील मुस्लिम समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी चर्चा करताना फारूक शाब्दि यांनी अमोल शिंदे यांचे कौतुक केले. डब्बे कसे का असेना, इंजिन चांगले असायला हवे. इंजिन बरोबर डब्यांना ओढत नेते, त्यामुळेच बापू हे इंजिन आहेत आपण सर्व डबे, त्यांनी आजपर्यंत फार इज्जत दिली आहे. प्रत्येक कार्यक्रमाला ते हजर झाले आहेत. म्हणून आमची कायम साथ त्यांना असेल आणि आपली मैत्री यापुढेही अशीच कायम राहावी अशी अपेक्षा व्यक्त केली. नक्की पहा हा व्हिडिओ…



















