पवित्र रमजान महिन्यात गरजू बांधवांना हा सण उत्साहाने साजरा व्हावा यासाठी संभव फाउंडेशनच्या वतीने रेशन किट धान्य वाटप करण्यात आले.सम्राट चौक परिसरातील मुस्लिम बांधवांना हे रेशन किट वाटप करण्यात आले.
रमजान ईदच्या मुहूर्तावर सामाजिक कार्यकर्ते सचिन वाघमारे, कॅक्टस फाउंडेशनचे रामेश्वर इराबत्ती,यांच्या हस्ते सदर किटचे वाटप करण्यात आले.या किट मध्ये गहू, मसूर दाळ, तूर दाळ, तेल, चहापत्ती, साखर, रवा, तांदूळ असे साहित्य होते.
यावेळी बहुसंख्येने मुस्लिम बांधव उपस्थित होते. सदर कार्यक्रमचे आयोजन संभव फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अतिश कविता लक्ष्मण सिरसट यांनी केलं होतं. यावेळी यासिन पटेल, महेश शिवशरण, राहूल सिरसट आदींची उपस्थिती होत


















