सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते तथा सोलापूर जिल्ह्याचे जिल्हा कार्याध्यक्ष उमेश पाटील यांची मोहोळ तालुक्यात आता चांगलेच क्रेझ निर्माण झाली आहे. तालुक्यातील प्रत्येक गावागावात ते जात असून त्यांच्या लोकप्रियतेत वाढ झाली आहे. त्यांचीही लोकप्रियता युवकांमध्ये तर आहेच परंतु आता छोट्या छोट्या मुलांमध्येही पाहायला मिळते. असेच तालुक्यातील नरखेड गावात कार्यक्रम सुरू होता. त्याचवेळी स्टेजवर साधारण पाच ते सहा वर्षाचा बालक आला त्याने माईक हातात घेतले आणि आपल्या बोबड्या भाषेत उमेश पाटील यांच्या कार्याची माहिती दिली हे पाहून उपस्थितांमध्ये टाळ्यांचा कडकडाट झाला आणि उमेश पाटील यांनी त्या बालकाला जवळ घेऊन आपल्या मांडीवर बसवले आणि त्याला शाबासकी दिली..पहा ते भाषण आणि तो प्रसंग.

















