सोलापूर : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मुंबई हून मंगळवारी सकाळी सोलापूरच्या विमानतळावर आगमन झाले. यावेळी जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, पोलिस आयुक्त राजेंद्र माने, महापालिका आयुक्त शीतल तेली उगले, पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार यांनी स्वागत केले.
राजकीय नेत्यांमध्ये खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर स्वामी, शहराध्यक्ष विक्रम देशमुख, माजी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांच्यासह राज्य सहकारी बँकेचे संचालक अविनाश महागावकर आवर्जून उपस्थित होते. यावेळी कर्नाटक राज्यातील काही नेते उपस्थित होते.
फडणवीस हे विमानाने आले आणि कारने कर्नाटककडे विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी रवाना झाले.





















