Wednesday, September 2, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

देवेंद्र फडणवीसांचा एका फोनवर पोलिस अधिकारी व कर्मचारी निलंबित ; पुण्यातील काय आहे असे प्रकरण

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
15 February 2024
in crime
0
देवेंद्र फडणवीसांचा एका फोनवर पोलिस अधिकारी व कर्मचारी निलंबित ; पुण्यातील काय आहे असे प्रकरण
0
SHARES
516
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

देवेंद्र फडणवीसांचा एका फोनवर पोलिस अधिकारी व कर्मचारी निलंबित ; पुण्यातील काय आहे असे प्रकरण

पुणे – चोरीच्या संशयावरून चौकशीसाठी पोलीस चौकीत आणलेल्या मोलकरीण महिलेला शिवीगाळ करीत बेदम मारहाण करणे पोलिसांना चांगलेच भोवले असून पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी एक सहायक निरीक्षक आणि दोन महिला पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत.

घरकाम करणार्या महिलेला झालेल्या गंभीर मारहाणीच्या प्रकरणात थेट गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडूनच पुण्याचे नवनियुक्त आयुक्त अमितेश कुमार यांना फोन केला. फोनवरून याबाबत सविस्तर माहिती घेत संबधित पोलिस अधिकारी आणि कर्मचार्यांवर तात्काळ कारवाई करण्याचे आदेश गृहमंत्र्यांनी दिल्याच कळतय. कसलाही पुरावा नसताना केवळ संशयावरून घरकाम करणार्या ह्या गरिब होतकरू महिलांच्या बाबतीत पोलिसांची ही पद्धत खपवून घेतली जाणार नाही असे स्पष्ट सुचनाही त्यांनी यावेळी केल्या.

ही कारवाई मंगळवारी (दि. १३) करण्यात आली. सहायक पोलीस निरीक्षक प्रमोद दोरकर, मुख्यालयात नेमणुकीस असलेल्या पोलीस शिपाई उषा सोनकांबळे (मुख्यालय शिवाजीनगर) आणि पोलीस शिपाई वैशाली उदमले अशी निलंबित करण्यात आलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची नावे आहेत.

परिमंडळ पाचचे उपायुक्त आर. राजा यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, ‘‘तक्रारदार महिलेने पोलिसांवर मारहाणीचे आणि शिवीगाळ केल्याचे आरोप केले आहेत. हे गंभीर स्वरूपाचे आरोप आहेत. या महिलेच्या अंगावर मारहाणीचे वळ होते. त्यामुळे तिची वैद्यकीय तपासणी करण्यास सांगण्यात आले होते. या वैद्यकीय तपासणी अहवालामध्ये या महिलेला इजा झाल्याचे नमूद आहे. त्यामुळे एक सहायक निरीक्षक, दोन महिला पोलीस कर्मचारी यांना निलंबित करण्यात आले आहे. या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची वैयक्तिक चौकशी निर्गमित करण्यात आली आहे. प्राथमिक कारवाई म्हणून निलंबन करण्यात आले आहे.’’

याबाबत तक्रारदार महिलेने पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली होती. त्यांनी कुटुंबीय आणि सामाजिक कार्यकर्त्यांसह सहपोलीस आयुक्त प्रवीण पवार यांची भेट घेत तक्रार केली होती. ही महिला मोलकरीण म्हणून काम करते. ती ज्या घरात मोलकरीण म्हणून काम करते, त्या घरामध्ये दागिन्यांची चोरी झाली होती. या घरातील कुटुंबीयांनी तक्रारदार महिलेवर संशय व्यक्त केला होता. तिला घरामध्ये डांबून ठेवले होते. तिला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले होते. पोलिसांनी तिला मगरपट्टा पोलीस चौकीत चौकशीसाठी आणले. त्यावेळी पोलिसांनी तिला बेदम मारहाण केली होती. तिला शिवीगाळ केली होती. तहान लागल्यावर प्यायला पाणी मागितले असता ‘मूत पी’ असे म्हणत उपनिरीक्षकासह चार पोलिसांनी मिळून मारहाण केल्याचा आरोप या महिलेने केला होता. तिचे नातवाईक शोध घेत पोलीस ठाण्यात गेले तेव्हा त्यांना पोलीस चौकीत पाठविण्यात आले. त्यावेळी महिलेला मारहाण सुरू होती. तिच्या पायावर आणि अंगावर मारहाणीचे वळ उठलेले होते. याबाबत नातेवाईकांनी पोलीस चौकीत जाऊन आरडाओरडा करीत पोलिसांना जाबदेखील विचारला होता. सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने नातेवाईकांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेऊन याबाबत तक्रार केली होती. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कारवाईचे आश्वासन दिले होते. यातच खुद्द राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री असणार्या फडणवीसांकडूनच या प्रकरणाची गंभीर दखल घेतल्यानंतर २४ तासाच्या आतच संबंधित पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आलीय.

Tags: Devendra fadnvisHome ministerPune police
SendShareTweetSend
Previous Post

दिलीप स्वामी छत्रपती संभाजी नगरच्या जिल्हाधिकारी पदी जॉईन ; पदभार घेताच मोठं वक्तव्य

Next Post

सोलापूर शिवजयंतीतील मंडळे पालकमंत्र्यांच्या ‘ओएसडी’कडे ; या वर्षी सांभाळून घ्या, आमचे पैसे अडकले आहेत 

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
सोलापूर शिवजयंतीतील मंडळे पालकमंत्र्यांच्या ‘ओएसडी’कडे ; या वर्षी सांभाळून घ्या, आमचे पैसे अडकले आहेत 

सोलापूर शिवजयंतीतील मंडळे पालकमंत्र्यांच्या 'ओएसडी'कडे ; या वर्षी सांभाळून घ्या, आमचे पैसे अडकले आहेत 

ताज्या बातम्या

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026
सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026
‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

17 August 2026
सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

11 August 2026
सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

10 August 2026
अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

10 August 2026
ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

9 August 2026

क्राईम

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

by प्रशांत कटारे
22 August 2026
0

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही सोलापुरातील वैभव वाघे खून खटल्याशी संबंधित सदर...

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

by प्रशांत कटारे
11 August 2026
0

oplus_2 oplus_2 सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले! सोलापूर : कुमठा...

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

by प्रशांत कटारे
10 August 2026
0

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल परिस्थितीजन्य पुरावा आधारीत खटला शाबितीसाठी परिस्थितीजन्य पुराव्याची...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

1998308
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group