शरद पवारांना मोठा धक्का ; अजित पवारांचा गट हाच खरा राष्ट्रवादी काँग्रेस
अजित पवारांचा गट हाच खरा राष्ट्रवादी काँग्रेस असल्याचा निर्णय आज निवडणूक आयोगाने दिला आहे. आगामी राज्यसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला नवीन नाव आणि चिन्ह देण्यासाठी विशेष सवलत प्रदान केली आहे.
6 महिन्यांहून अधिक काळ चाललेल्या 10 हून अधिक सुनावणीनंतर हा निकाल देण्यात आला आहे. राज्यसभा निवडणुकीपूर्वी निवडणूक आयोगानं हा मोठा निर्णय दिलेला आहे. शरद पवार यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
अजित पवार खूप आनंदी आहेत. त्यांनी घेतलेल्या राजकीय निर्णयावर शिक्कामोर्तब झालेलं आहे, असं सुनील तटकरे यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे.