गॅसस्फोट दुर्घटनाग्रस्त कुटुंबास एम के फाउंडेशनचा आधार ; साक्षात महादेव धावून आला
तील्हेहाळ (ता. दक्षिण सोलापूर) येथे नुकत्याच झालेल्या म्हाळप्पा धायगुडे यांच्या घरात अचानकपणे झालेल्या गॅस दुर्घटनेत त्यांची पत्नी व लहान मूल मयत पावले. आगीत पुर्णपणे घर जळून भस्मसात झाले आहे. या दुर्घटनेची माहिती एम के फाउंडेशनचे अध्यक्ष महादेव कोगनुरे यांना मिळताच तत्परतेने त्यांनी कुटुंबाला मानसिक आधार देवून आर्थिक मदत केले.
महादेव कोगनुरे यांनी घरात गॅस सिलेंडर वापरताना काळजीपूर्वक योग्य खबरदारी घेणं खूप गरजेचं आहे असे आवाहन केले. महादेव कोगनुरे हे अशा प्रसंगात सगळ्यात आधी धावून येवून कायमच मदत करत असतात त्यामुळे लोकामध्ये साक्षात महादेव धावून आला अशी चर्चा आहे.
याप्रसंगी गावचे सरपंच गणेश जाधव, उपसरपंच सिद्धाराम धायगुडे, ग्रामपंचायत सदस्य संदिपान धायगुडे ,सुनिता चव्हाण, राजेंद्र धायगुडे, पोलीस पाटील शशिकांत चोपडे, बाबुराव धायगुडे हिराचंद राठोड ,प्रकाश धायगुडे, सिद्राम शिंदे, अशोक धायगोडे,प्रथम वावरे, रमेश चव्हाण, गणपती चोपडे, अमोल करे, लक्ष्मण बंडगर, ज्ञानेश्वर वावरे, शिवा धायगुडे, विठ्ठल मुस्के आदी उपस्थीत होते.