सोलापूर दि.18 (जिमाका) :- प्रधानमंत्री नरेंद्र मोदींची कुंभारीत सभा ; पोलिसांनी केले या मार्गात बदल :
पंतप्रधान भारत सरकार यांचे हस्ते रे नगर कुंभारी येथील पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत असंघटीत कामगरांसाठी बांधण्यात आलेल्या घरकुल योजनेचा लोकार्पण सोहळा दि.19 जानेवारी 2024 रोजी संपन्न होणार आहे. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने कोणत्याहि प्रकारचा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये या साठी सोलापूर- हैद्राबाद रोड वरील दोड्डी फाटा ते कुंभारी जाणारा रस्ता राज्यमार्ग क्र. 205 हा दि. 19 जानेवारी 2024 रोजीचे 00.01 ते दि.19 जानेवारी 2024 रोजीचे 24.00 वा. पर्यंत सर्व प्रकारचे वाहतुकीसाठी (अत्यावश्यक सेवेची वाहने वगळून) बंद करून वाहने पर्यायी मार्गाने वळविणे आवश्यक असल्याने .महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 33(1)(ब) या अधिकारान्वये , श्री शिरीष सरदेशपांडे (भा.पो.से.) पोलीस अधीक्षक ,सोलापूर ग्रामीण यांनी मा. पंतप्रधान भारत सरकार यांच्या सुरक्षेच्या कारणास्तव सोलापूर ते हैद्राबाद रोडवरील दोड्डी फाटा ते कुंभारी जाणारा रस्ता बंद करणेबाबत निर्देश दिले आहेत .
पथक्रमण करण्यास मनाई करण्यात आलेले मार्ग-
दोड्डी फाटा – दोड्डी चौक- रे नगर- कुंभारी या मार्गावर पथक्रमण करण्यास मनाई करण्यात येत आहे.
कुंभारी –रे नगर –दोड्डी चौक –दोड्डी फाटा या मार्गावर पथक्रमण करण्यास मनाई करण्यात येत आहे.
सदरील मार्गावरील वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग पुढील प्रमाणे
तांदुळवाडी –मुस्ती –धोत्री-वडगाव-दिंडुर –वळसंग या मार्गाने पथक्रमण करावे
वळसंग –दिंडुर –वडगाव-धोत्री –मुस्ती – तांदुळवाडी या मार्गाने पथक्रमण करावे.
वरील बंधने ही पोलीस ,रुग्ण्सेवा ,अग्निशमनदलाची वाहने अत्यावश्यकसेवेतील वाहने व परवानगी दिलेल्या वाहनांना लागू राहणाार नाही.