सोलापूर : राज्य शासनाने काही दिवसांपूर्वी नायब तहसीलदार यांना तहसीलदार पदावर पदोन्नती दिली होती. त्या नियुक्तीच्या वेटिंग मध्ये असलेल्या 74 तहसीलदारांना शासनाने वेगवेगळ्या ठिकाणी नियुक्ती दिली आहे. सोलापुरातील लीना खरात यांना सांगली जिल्ह्यातील सर्वसाधारण तहसीलदार म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे.
सांगोल्याचे तहसीलदार अभिजीत पाटील हे पदोन्नतीने उपजिल्हाधिकारी झाले आहेत. त्यांच्या जागेवर संजय भगवान खडतरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच लाभक्षेत्र विकास प्राधिकरण जिल्हा सोलापूर तहसीलदार पदी ए एम इवरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तहसीलदार पदातून उपजिल्हाधिकारी पदावर पदोन्नती झालेल्या अधिकाऱ्यांना अद्यापही नियुक्ती देण्यात आलेल्या नाहीत.


















