सोलापूर : शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून चौधरी फौंडेशनने द्वारकाधीश मंदिर जुळे सोलापूर येथे पवित्र हिंदू ग्रंथ “भागवदगीता ” १५० महिलांना भेट म्हणून दिली. कार्यक्रमाची सुरूवात मुग्धा वडकबाळकर यांनी गीतेचे जीवनातील महत्व सांगून केली, त्यानंतर सर्व प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केल्यानंतर शिवसेनेचे समन्वयक दिलीप कोल्हे व जिल्हा संपर्क प्रमुख शिवाजी सावंत, जिल्हा प्रमुख अमोल शिंदे यांनी आपले विचार मांडले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शोभा देशपांडे यांनी केले तर प्रास्ताविक रत्नामाला दगडे यांनी केली. कार्यक्रमाला द्वारकाधीश मंदिराचे व्यवस्थापक पाठक यांनी सहकार्य केले. आभार प्रदर्शन चौधरी फौंडेशनचे अध्यक्ष चेतन चौधरी यांनी केले.




















