Monday, May 4, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

मंत्री तानाजी सावंतांच्या संकल्पनेतून महाआरोग्य शिबिर ‘आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी’ ; इतक्या लाख भाविकांच्या आरोग्याची होणार तपासणी

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
7 June 2023
in solapur
0
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 




पंढरपूर, दि. 07 (उ. मा. का.) : आषाढी यात्रेनिमित्त पालखी सोहळ्याबरोबर मोठ्या प्रमाणात वारकरी, भाविक येतात. येणाऱ्या वारकरी भाविकांच्या आरोग्य तपासणीसाठी आरोग्य विभागाच्या वतीने मोफत महाआरोग्य शिबिर घेण्यात येणार आहे. ‘आरोग्याची वारी पंढरीच्या दारी’ह्या संकल्पनेवर आधारित वारी कालावधीत सुमारे 20 लाख भाविकांची तपासणी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. ह्यासाठी राज्यातील वैद्यकीय कर्मचारी, डॉक्टर्स यांच्यासह परराज्यातून देखील वैद्यकीय पथके मागविण्यात येणार असल्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी सांगितले.

 

आषाढी यात्रा कालावधीत मोफत महाआरोग्य शिबिर आयोजनाबाबत पंढरपूर येथे आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीस प्र. जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, उपविभागीय अधिकारी गजानन गुरव, उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले, आरोग्य उपसंचालक डॉ. राधाकृष्ण पवार, तहसिलदार सुशिल बेल्हेकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धनंजय पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सोनिया बागडे, गटविकास अधिकारी प्रशांत काळे, मुख्याधिकारी अरविंद माळी, तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.


सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत म्हणाले, आषाढी यात्रा कालावधीत भाविकांना तात्काळ व दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी यात्रा कालावधीत पंढरपूर येथे ठिकाणं निश्चित करुन महाआरोग्य शिबिर घेण्यात येणार आहे. या शिबिरात सुसज्ज आरोग्य यंत्रणेसह तज्ज्ञ डॉक्टरांच्या सेवा उपलब्ध करण्यात येणार असून, भाविकांची आरोग्य तपासणी करुन तात्काळ उपचार करण्यात येणार आहेत. तसेच याठिकाणी भाविकांना सकस आहारही दिला जाणार आहे. त्याचबरोबर नदी पात्र, 65 एकर, पत्राशेड व ज्या ठिकाणी मठ, धर्मशाळा यांची संख्या जास्त आहे व वारकरी भाविक मोठ्या प्रमाणात थांबतात, अशा ठिकाणी सर्व आरोग्य सुविधा देण्याकरिता  तात्पुरते दवाखाने सज्ज ठेवावेत. ऑक्सिजन, रक्तसाठा, औषधसाठा मुबलक प्रमाणात उपलब्ध ठेवावा, अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.


डॉ. तानाजी सावंत म्हणाले, पालखी सोहळ्याबरोबर मोठ्या संख्येने वारकरी भाविक चालत येतात. सद्यस्थितीत उष्णतेचे प्रमाण जास्त असल्याने पालखी मार्गावर व मुक्कामाच्या ठिकाणी  मुबलक पाणीपुरवठा करावा. यासाठी टँकरची संख्या वाढवावी. उष्माघाताच्या आजाराबाबत उपाययोजना करावी. आरोग्य सुविधांसाठी वापरण्यात येणारे साहित्य, तपासणी मशीन सुस्थित असाव्यात. भाविकांना पालखी मार्गावर वेळेत उपचार मिळावेत, यासाठी फिरत्या दवाखान्याचे नियोजन करावे. वारी कालावधीत सर्व खाद्यपदार्थांच्या हॉटेलची वेळोवेळी तपासणी करावी. उपलब्ध आरोग्य सुविधांचे फलक लावावेत. तसेच ध्वनीक्षेपकाव्दारे जनजागृती करावी. महावितरण विभागाने पालखी मुक्कामाच्या ठिकाणी अखंडित वीजपुरवठा करावा. आवश्यक ठिकाणी जादा रोहित्र बसवावेत. तसेच वारी कालावधीत भाविकांच्या सुरक्षा, आरोग्य,  पाणीपुरवठा व स्वच्छतेला प्राधान्य द्यावे, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.    


यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सोनिया बागडे यांनी पालखी मुक्काम, मार्ग तसेच पंढरपूर शहरात वारी कालावधीत वारकरी, भाविकांच्या सुविधेसाठी आरोग्य विभागामार्फत करण्यात येणाऱ्या सोयी-सुविधांत माहिती  दिली.


वाखरी पालखी तळ, 65 एकरची आरोग्यमंत्र्यांनी केली पाहणी

दरम्यान, आषाढी यात्रेनिमित्त पालखी सोहळ्याबरोबर येणाऱ्या वारकरी, भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. त्या पार्श्वभूमिवर आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी पालखी तळची पाहणी करून प्रशासनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या सुविधांबाबत माहिती घेतली. तसेच 65 एकरमध्ये मोठ्या प्रमाणात दिंड्या उतरतात. दिंड्यासोबत वारकरी, भाविक मोठ्या संख्येने असतात. या ठिकाणीही देण्यात येणाऱ्या सुविधांची माहिती घेवून आवश्यक सूचना त्यांनी यावेळी दिल्या. यावेळी त्यांच्या समवेत उपविभागीय अधिकारी गजानन गुरव, मुख्यधिकारी अरविंद माळी, कार्यकारी अभियंता अमित निमकर उपस्थित होते.

SendShareTweetSend
Previous Post

सोलापूरच्या नूतन जिल्हाधिकारी कार्यालयात कामकाज सुरू पण सुविधांचा अभाव ; प्रभारी जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांनी घेतला तातडीचा निर्णय

Next Post

सोलापुरातील जोशी गल्लीत गांजा विक्री करताना तरुणाला पकडले

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

सोलापुरातील जोशी गल्लीत गांजा विक्री करताना तरुणाला पकडले

ताज्या बातम्या

सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

4 May 2026
सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

29 April 2026
अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

28 April 2026
सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

22 April 2026
रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

16 April 2026
निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

15 April 2026
खासदार ज्योती वाघमारे यांची ‘ सिंहासन’ला भेट ; कौटुंबिक सोहळ्याने ताई भारावल्या!

खासदार ज्योती वाघमारे यांची ‘ सिंहासन’ला भेट ; कौटुंबिक सोहळ्याने ताई भारावल्या!

14 April 2026
सोलापुरात भीम जयंती निमित्त सामूहिक बुद्ध वंदना ; सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एकत्रित केले महामानवास अभिवादन

सोलापुरात भीम जयंती निमित्त सामूहिक बुद्ध वंदना ; सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एकत्रित केले महामानवास अभिवादन

14 April 2026

क्राईम

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
28 April 2026
0

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात वारस नोंद लावण्यासाठी मंडळ अधिकारी हेमंत चंद्रकांत फुलारी...

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

by प्रशांत कटारे
29 March 2026
0

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले सोलापूर - सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत...

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

by प्रशांत कटारे
15 March 2026
0

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला अवैध व्यवसायातील पैशाच्या हिशोबाच्या वादातून अथर्व जाधव याचा खुन...

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

Our Visitor

1979043
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group