सोलापूर येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी सोलापूर भोला यांनी गांजा बाळगल्या प्रकरणी भवानी पेठ येथील तरुण रहिवासी याची रु.१५,००० च्या जमिनावर मुक्तता केली.
यात थोडक्यात हकिकत अशी की, भवानी पेठ, मड्डी वस्ती येथील तरुण त्याच्या जवळील पिशवीमधून संशयास्पद हालचाली करत काही वस्तु विकत आहे. अशी बातमी जोडभावी पेठ पोलीसांना गुप्त बातमीदारा मार्फत मिळाली. पोलीसांनी त्वरीत हालचाल करुन त्या तरुणास गांजासह दि.०२/०६/२०२३ रोजी अटक केली व न्यायालयात हजर केले. आरोपी तरुणाने अॅड. शांतवीर महिंद्रकर यांच्यामार्फत न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला. तेव्हा आरोपीच्या वकिलांचा व सरकरी वकीलांचा युक्तिवाद ऐकून न्यायाधिश भोला यांनी आरोपीच्या वकीलांचा युक्तिवाद ग्राह्य धरुन रु.१५,००० च्या जामिनावर आरोपीची मुक्तता केली.
सदरकामी ‘आरोपीतर्फे अॅड. शांतवीर महिंद्रकर, अॅड. सौ. वैशाली महिंद्रकर, अॅड. ओंकार बिराजदार, अॅड. संदिप संगा, अॅड. इरेश केचीगुंडी यांनी काम पाहिले.

















