सोलापूर : भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सोलापूर शहर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी श्री छत्रपती रंगभवन सभागृहात भाजपच्या वॉरिअरची बैठक घेतली. त्या सभेपूर्वी रंगभवन सभागृहाच्या गेटच्या बाजूला चंद्रकांत बावनकुळे यांचा भाजपच्या कार्यकर्त्यांनी क्रेनने भला मोठा हार घालून सत्कार केला.
सत्कारावेळी बावनकुळे यांनी या फोटो फ्रेममध्ये आमदार सुभाष देशमुख, आमदार विजयकुमार देशमुख, माजी खासदार अमर साबळे यांच्यासह आवर्जून भाजप जिल्हाध्यक्ष आमदार सचिन कल्याणशेट्टी यांना स्वतः बोलावून घेत फोटो फ्रेम पूर्ण केली. खरे तर हा कार्यक्रम शहरात असल्याने शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांनाही या फोटोमध्ये घ्यायला पाहिजे होते परंतु बावनकुळे यांना काळे यांचा विसर पडला.