सोलापूर : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस पक्षाचे अनुसूचित जाती जमाती विभागाचे प्रदेश पदाधिकारी नितीन शिवशरण हे भाजपच्या गोटात दिसल्याने सोलापुरातील काँग्रेस पक्षाला हा धक्का मानला जात आहे.
सोलापुरात भारतीय जनता पार्टीचा पदाधिकारी व सुपर वॉरियर्स मेळावा श्री छत्रपती रंगभवन सभागृहात आयोजित करण्यात आला होता. या बैठकीत काँग्रेस पक्षाचे अनुसूचित जाती विभाग सेलचे प्रदेश पदाधिकारी राहिलेले नितीन शिवशरण हे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पाठीमागे बसलेले दिसून आले.
एकीकडे प्रणिती शिंदे यांनी लोकसभा निवडणुकीसाठी रणशिंग फुंकले असताना दुसरीकडे नितीन शिवशरण भाजपाच्या गोठ्यात दिसल्याने हा काँग्रेसला धक्काच म्हणावा लागेल.
नितीन शिवशरण हे आमदार सत्यजित तांबे यांचे समर्थक मित्र मानले जातात. सध्या ते भाजप नेते उदय पाटील यांच्यासोबत पाहायला मिळत असून लवकरच ते भाजप प्रवेश करणार असल्याचे ऐकण्यास मिळाले.