Tuesday, August 25, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापुरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या वाघांची तोंडे चारी दिशेला ; समन्वय गेला कुठे? शहर प्रमुख कोण? हे तर कुणालाच माहिती नाही

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
10 June 2023
in solapur
0
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : महाविकास आघाडीच्या सरकारला खाली खेचून राज्यात शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले. त्यामुळे शिवसेनेत दोन गट पडले. मातोश्रीचे अनेक निष्ठावंत शिंदे यांना जावून मिळाले. सोलापूरात एकनाथ शिंदे समर्थक गट मोठा आहे. ते मुख्यमंत्री झाल्यानंतर शहरातील महेश कोठे समर्थक अमोल शिंदे, उमेश गायकवाड यांच्यासह  मनोज शेजवाळ हे शिंदे गटात गेले. मनिष काळजे हे तर कट्टर एकनाथ भाई समर्थक. तानाजी सावंत हे सत्तेत असल्याने शिवाजी सावंत हे पण इकडेच राहिले. लक्ष्मीकांत ठोंगे पाटील यांनीही सत्तेच्या बाजूकडे राहण्यात समाधान मानले.

राज्यात आपला मुख्यमंत्री असताना या नेत्यांमध्ये समन्वय दिसत नाही. जो येईल त्याला पदे वाटण्यात आली, पक्षाचे शहरात कुठेही मध्यवर्ती कार्यालय नाही, अमोल शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात आपल्या जागेत स्वतःचे संपर्क कार्यालय केले, तिथे पाहिले तर दिलीप कोल्हे, नाना मस्के दिसतात. मनीष काळजे यांचे शुभराय गॅलरी जवळ कार्यालय असून तिथून ते लोकांची सेवा करतात. मनोज शेजवाळ यांचं रेल्वे लाईन इथले घरचं त्यांचं कार्यालय आहे, तिथे उमेश गायकवाड पहायला मिळतात. शेजवाळ यांना भेटायचे म्हटले तर दुपारी बारा एक नंतर जावे लागत असल्याची चर्चा आहे. लक्ष्मीकांत ठोंगे पाटील हे तर आपल्या विजापूर रोडवरील निवासस्थानी असतात ते कोणत्याही नेत्यासोबत सहसा दिसत नाहीत.

जिल्हा संपर्कप्रमुख प्राध्यापक शिवाजी सावंत आले तर ते शासकीय विश्रामगृहात आपला ठिय्या मांडतात तिथेच बैठका घेऊन पदाधिकारी कार्यकर्त्यांना भेटतात. ज्या बैठकीला मनीष काळजे असतात त्या बैठकीला अमोल शिंदे दिसत नाहीत. शिंदेच्या कार्यक्रमाला काळजे दिसत नाहीत. गटबाजी इतकी आहे की कार्यकर्तेही त्या गटबाजीत विभागले गेले आहेत.

सोलापुरात एकनाथ शिंदे शिवसेना गटाचे शहर प्रमुख कोण? हे बऱ्याच लोकांना माहीत नाही अशी मजेदार चर्चा ऐकण्यास मिळते. सोलापुरातील ज्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये समन्वय नाही त्याच पक्षातील ज्येष्ठ नेते माजी उपमहापौर दिलीप कोल्हे यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटात प्रवेश केला. त्यांना तर समन्वयक म्हणून पद देण्यात आले आहे ज्या पक्षात समन्वय नव्हता तिथून आलेल्या हा नेता सेनेतील गटबाजी पाहता कसा काय समन्वय साधणार असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.

SendShareTweetSend
Previous Post

समाज कल्याण अधिकारी म्हणतात “या ऑर्डर बोगस” ; मुलाच्या नोकरीसाठी जमीन दिली, अकरा वर्षापासून होत आहे फसवणूक ; नेमके काय आहे प्रकरण वाचा

Next Post

जिल्हाधिकाऱ्यांनी नाकारला सत्कार अन् बापूंनी असे सुचवले की ते सर्वानाच आवडले ; एकरुख तलावातून रोज जातो ‘साडेतीन हजार घनमीटर गाळ’

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

जिल्हाधिकाऱ्यांनी नाकारला सत्कार अन् बापूंनी असे सुचवले की ते सर्वानाच आवडले ; एकरुख तलावातून रोज जातो 'साडेतीन हजार घनमीटर गाळ'

ताज्या बातम्या

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026
‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

17 August 2026
सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

11 August 2026
सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

10 August 2026
अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

10 August 2026
ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

9 August 2026
निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

अय्यो ! आता कस रे बाबा, चार्ज गेला की, तेव्हा झेडपी सदस्यांनी वाचवले होते ; आरोग्यच्या ‘डॅम’ पदमुक्त

4 August 2026

क्राईम

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

by प्रशांत कटारे
22 August 2026
0

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही सोलापुरातील वैभव वाघे खून खटल्याशी संबंधित सदर...

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

by प्रशांत कटारे
11 August 2026
0

oplus_2 oplus_2 सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले! सोलापूर : कुमठा...

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

by प्रशांत कटारे
10 August 2026
0

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल परिस्थितीजन्य पुरावा आधारीत खटला शाबितीसाठी परिस्थितीजन्य पुराव्याची...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

Our Visitor

1996468
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group