सोलापूर : सोलापुरातून मागील काही दिवसांपासून बेपत्ता झालेल्यांची संख्या वाढत आहे. त्यामध्ये विवाहित स्त्रिया आणि कॉलेजला जाणाऱ्या तरुणींचा समावेश सर्वाधिक आहे.
शहरातील रेल्वे लाईन परिसरातील निकिता जयराम शासम वय 21 हिच्यासह इंदिरा नगर झोपडपट्टी रजिया करीम सय्यद वय 42 या दोघी बेपत्ता झाल्या आहेत.
रजिया सय्यद या 1 जून 2023 रोजी सकाळी 7 वाजता कुणाला न सांगता घरातून निघून गेली तर निकिता ही 2 जून 2023 रोजी दुपारी साडे चार वाजता कुणालाही न सांगता घरातून निघून गेली आहे. या दोघींचा नातेवाईकांकडे शोध घेतला असता त्या मिळून आल्या नाहीत. दोघी कुठे मिळून आल्यास सदर बझार पोलीस ठाण्यास संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे.



















