सोलापूर शहरातील सत्तर फूट रोड येथील माधव नगर येथे रविवारी सकाळचा सुमारास अपघात झाला आहे. क्रेनने दिलेल्या धडकेत एका वृध्दाचा मृत्यू झाला आहे. सदर अपघाताची घटना सीसीटिव्हीत कैद झाली आहे. विश्वनाथ धोंडीबा जाधव वय 77 राहणार भारतरत्न इंदिरानगर सोलापूर असे मयत व्यक्तीचे नाव आहे.
MH 13 DM 5382 यातील क्रेन चालकाने धडक दिल्याने जागीच मृत्यू झाला आहे. घटना घडताच नागरिकांची एकच गर्दी झाली होती. मृतदेह सोलापूर शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. या घटनेची नोंद सिव्हिल पोलीस चौकी येथे झाली आहे.


















