सोलापूर : सामाजिक व राष्ट्रीय दायित्व बरोबर सभासद व संस्थेचे काळजी घेणारी पतसंस्था मी यापूर्वी पाहिले नाही असे प्रतिपादन मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी केले.
जिल्हा परिषद पतसंस्था क्रमांक एक चे 89 व्या सर्वसाधारण सभेच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी स्वामी यांच्या हस्ते ऑनलाईन एक कोटी रुपयाचे लाभांश वितरण ही करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी वित नियंत्रक म्हाडा अजयसिंह पवार हे होते.
सर्व गरजांची पूर्तता करण्याचे काम पतसंस्था क्रमांक 1 करते आहे आणि आता सध्या नवीन गृहनिर्माण प्रकल्प एक अभिनव कल्पना असल्याचेही प्रतिपादन स्वामी यांनी केले. याप्रसंगी वित्त नियंत्रक अजय पवार यांनीही संस्थेच्या कामाबद्दल कौतुक करून शुभेच्छा दिल्या.
सुरुवातीला चेअरमन विवेक लिंगराज यांचे अध्यक्षतेखाली सर्वसाधारण सभा चर्चेअंती सर्व 16 विषयांना एकमताने मंजुरी देण्यात आली. संजय गौडगाव, वासू घाडगे, नितीन शिंदे, समीर कुंभार, खुर्द आदींनी चर्चेत भाग घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. एस. पी .माने तर आभार प्रदर्शन वाईस चेअरमन सुहास चेळेकर यांनी केले. याप्रसंगी रक्तदान शिबिर व सर्व सभासदांची आरोग्य तपासणी सुद्धा करण्यात आली. रक्तदानाची शिबिराचे उद्घाटन मुख्य लेखा व वित्त अधिकारी उत्तम सुर्वे यांनी रक्तदान करून शिबिराचे उद्घाटन केले. तपासणीमध्ये रक्तदाब, रक्त चाचण्या, इसीजी व आरोग्य चिकित्सा करण्यात आली. 50 सेवानिवृत्त सभासदांचा शाल व रोप देऊन स्वामी व पवार यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
या सभेस जेष्ठ संचालक श्रीशैल देशमुख, संचालक दत्तात्रय घोडके, शेखर जाधव, शहाजान तांबोळी, विष्णू पाटील, धन्यकुमार राठोड, हरिबा सपताळे, सुंदर नागटिळक, मृणालिनी शिंदे, सुनंदा यादगिरी, दीपक घाडगे, सुखदेव भिंगे, अनिल जगताप, त्रिमूर्ती राऊत आदी उपस्थित होते. सभेचे कामकाज सचिव दत्तात्रय देशपांडे यांनी विषय वाचन करून केली. सर्वसाधारण सभा यशस्वी करण्यासाठी सुभाष काळे, अशोक पवार, विनोद कदम, जगदेवी अजनाळकर आदींनी परिश्रम घेतले.


















