सोलापूर : जिल्हा परिषदेची प्रशासकीय सर्वसाधारण सभा सोमवारी यशवंतराव चव्हाण सभागृहात संपन्न झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी होते.
सभेला अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, सचिव तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशादीन शेळकंदे, मुख्य वित्त व लेखा अधिकारी उत्तम सुर्वे, माध्यमिक शिक्षणाधिकारी जावेद शेख, प्राथमिक शिक्षणाधिकारी संजय जावीर, बांधकाम कार्यकारी अभियंता नरेंद्र खराडे, कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी, कार्यकारी अभियंता सुनील कटकधोंड, प्रकल्प संचालक अमोल जाधव, कृषी विकास अधिकारी परमेश्वर वाघमोडे यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.
या सभेमध्ये आषाढी वारीच्या अनुषंगाने चर्चा झाली. वाढीव निधी जिल्हा परिषद सेस मधून खर्चास मंजुरी देण्यात आली. मार्चमध्ये झालेल्या जिल्हा परिषदेच्या अंदाजपत्रकाला मंजुरी देण्यात आली.
आषाढी वारी मार्गावरील प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रातील औषध साठा तपासून त्याचा अहवाल तातडीने सादर करण्याच्या सूचना आरोग्य विभागाला प्रशासक स्वामी यांनी दिल्या. त्यात हलगर्जीपणा झाल्यास कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिलाय. सन 22-23 मधील जिल्हा परिषदेचा सेस निधी खर्च झाला नसेल तर तो जून 23 अखेर खर्ची पाडा अशा सूचनाही सर्व विभागप्रमुखांना करण्यात आल्या आहेत.


















