सोलापूर : संसदेत जनतेच्या मूलभूत प्रश्नांविषयी आवाज ठेवणारे या गाडीचा 141 खासदारांना निलंबित करून लोकशाहीची मुस्कटदाबी करणाऱ्या केंद्रातील भाजप सरकारच्या हुकुमशाही विरोधात सोलापूर शहर इंडीया आघाडीच्या वतीने निदर्शने आंदोलन करण्यात आली.
काँग्रेस पक्षाचे आमदार प्रणिती शिंदे यांनी यावेळी बोलताना केंद्रातील मोदी सरकारचा तीव्र शब्दात निषेध नोंदवला. हे सरकार जनतेचे नाही आदानी अंबानीचे आहे. जनतेने अशांपासून सावध राहिले पाहिजे. सामान्य लोकांना भाजप नको आहे त्यामुळे आता इंडिया आघाडीने एकत्रित राहून प्रत्येकाच्या घरोघरी पोहोचले पाहिजे असे आवाहन करताना देशाचा पंतप्रधान तुमच्या सोबत नाही परंतु आम्ही कायम राहणार असा विश्वास यावेळी त्यांनी दिला.