सोलापूर : महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने मंगळवारी अचानक सोलापूरच्या सराफ बाजारामध्ये धडक कारवाई केली. सराफ बाजारांमधील अतिक्रमण कोणतीही पूर्व नोटीस न देता काढले.
अचानक झालेल्या कारवाईमुळे सराफांमध्ये संतापाचे वातावरण आहे. बुधवारी सराफ असोसिएशनच्या वतीने कडकडीत बंद पाळण्यात आला. एकही दुकान चालू होते, सर्व सराफ रस्त्यावर उतरले आणि महापालिका प्रशासनाचा निषेध नोंदवण्यात आला.
सोलापुरात एकीकडे श्री सिद्धेश्वर साखर कारखान्याच्या चिमणी पाडण्याचा विषय ऐरणीवर असताना दुसरीकडे मात्र सराफ व्यापारी यांनी आपली सर्व दुकाने बंद केली होती. दरम्यान मंगळवारी झालेल्या बेकायदा अतिक्रमण मोहिमेची आमदार विजयकुमार देशमुख यांनी पाहणी केली, सर्व सराफांची चर्चा केली.
यावेळी महापालिकेच्या कारभाराविरोधात सोलापूर व्यापाऱ्यांनी आमदार देशमुख यांच्यासमोर अशी नाराजी व्यक्त केल्याचे दिसून आले. व्यापाऱ्यांशी झालेल्या चर्चेनंतर गुरुवारी सर्व व्यापाऱ्यांसमवेत महापालिका आयुक्तांची भेट घेणार असल्याचे आश्वासन दिले. पहा देशमुख काय म्हणाले….





















