महाराष्ट्र एसटी को-ऑपरेटिव बँक लिमिटेड च्या निवडणुकीसाठी महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस इंटकच्या वतीने परिवर्तन पॅनल उभे केले असून या पॅनल मधून सोलापूर आगाराच्या सुवर्णा किसन रजपूत या सर्वसाधारण मतदरसंघातुन उभे आहेत. त्यांच्या प्रचाराचा शुभारंभ सोलापुर शहर काँग्रेस अध्यक्ष चेतन नरोटे यांच्या हस्ते करण्यात आला. महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस इंटकचे विभागीय अध्यक्ष विनोद भोसले यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले आहे.
या कार्यक्रमास राज्य कोषाध्यक्ष श्रीकांत सड्डु, राज्य सरचिटणीस अशोक बनसोडे, राज्य संघटक सचिव सदाशिव अंबुरे, शिवानंद गौडगाव, आगाराध्यक्ष आनंद शिंदे, आगार सचिव रवींद्र राठोड, तसेच मुजाहिद जमादार, सचिन चव्हाण, रवींद्र गायकवाड, मुंबई पटेल, रवींद्र चव्हाण, जुबेर कुरेशी, आलम पठाण, अमोल दोडके, दादा जाधव, महिला प्रतिनिधी अनुराधा नवगिरे, तिरुपती परकीपंडला, महेश लोंढे, विवेक कन्ना, राजेन्द्र शिरकुल, दिनानाथ शेळके, आबा मेटकरी, शाहु सलगर, रूपेश गायकवाड़, सुभाष वाघमारे, संजय गायकवाड़, बसु कोळी, सौरभ सालुंखे, निखिल पवार, अक्षय जाधव, अमीर शेख, बंडू बिराजदार, गणेश वड्डेपल्ली, इत्यादी उपस्थित होते.
या बँक निवडणुकीत कर्मचाऱ्यांना देण्यात येणारे कर्जाचा व्याजदर कमी करणे, विना जामीनदार कर्ज देणे, मयत कर्मचाऱ्यांचे कर्ज माफ करणे इत्यादी विषय घेऊन परिवर्तन पॅनल निवडणुकीत उतरले आहे.
यावेळी चेतन नरोटे, इंटक विभागीय अध्यक्ष विनोद भोसले, राज्य कोषाध्यक्ष श्रीकांत सडडु, उमेदवार सुवर्णा रजपूत यांनी इंटक प्रणित परिवर्तन पँनलला विजयी करण्याचे आवाहन केले.


















