Saturday, July 18, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

क्रिकेट प्रेमींनों….! 29 वर्षांनी सोलापूरात रणजी सामना होणार

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
17 December 2023
in Sports
0
क्रिकेट प्रेमींनों….! 29 वर्षांनी सोलापूरात रणजी सामना होणार
0
SHARES
688
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

एमसीएचे अध्यक्ष आमदार रोहित पवार यांचे मुळे सदर सामना सोलापूरात होत असून अध्यक्ष झाल्यावर पहिल्यांदाच सोलापूर ला आल्यावर स्टेडियम पाहणी करून तशी इच्छा व्यक्त केलेली आणि वर्ल्ड कप पूर्वी जाहीर पण केलेले.

BCCI अर्थात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळ वर जाहीर माहितीनुसार 2024 मध्ये 5 जानेवारी पासून सोलापुरातील प्रसिद्ध इंदिरा गांधी पार्क स्टेडियम येथे महाराष्ट्र विरुद्ध मणिपूर असा 4 दिवसीय रणजी सामना होणार असल्याचे कळते.

सोलापुरातील सांख्यिकी मिलिंद गोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार 2023-24 ह्या डोमेस्टिक क्रिकेट सीझन मधील पुरुषांच्या वरिष्ठ गटाच्या 4 दिवसीय रणजी करंडकाला 5 जानेवारी पासूनच देशात विविध ठिकाणी सुरूवात होत असून महाराष्ट्र संघाचा नवीन वर्षातील शुभारंभाचा सामना हा मणिपूर संघासमवेत होणार असल्याचे कळते. या दोन्ही संघाचा रणजी ट्रॉफी साठी Elite A गटात समावेश असून झारखंड, सौराष्ट्र, सेनादल, हरियाणा, राजस्थान, विदर्भ हे संघ देखील याच गटात असणार आहेत.

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन चे वतीने या सामन्याचे आयोजन सोलापूरला देण्यात आले असल्याचे प्राथमिक माहितीनुसार कळते. गेल्या वर्षभरात BCCI चे 3 सामने याठिकाणी झाले असून वरिष्ठ गटातील पहिलाच सामना असल्याचे
मिलिंद गोरे यांनी दिलेल्या माहिती नुसार, 1994 नंतर म्हणजेच तब्बल 29 वर्षांनी सोलापूरात रणजी करंडक मधील सामना होत असून 23 डिसेंबर 1994 रोजी शेवटचा रणजी सामना मुंबई – महाराष्ट्र संघात झाला होता जो अनिर्णीत अवस्थेत संपला होता पण मुंबई संघाने पहिल्या डावात आघाडी घेतली होती. त्याकाळी आधी मर्यादित षटकांचे (एकदिवसीय पद्धतीचे) सामने व्हायचे आणि लगेच 4 दिवसीय सामना. त्याकाळी झालेल्या सामन्यात दोन्ही संघातील अनेक दिग्गज खेळाडूंनी आपले दमदार प्रदर्शन केले होते ज्यात महाराष्ट्र कडून इक्बाल सिद्दीकी, जेधे, गुदगे, किणीकर, सुगवेकर, चितळे, भावे, काळे तर मुंबई कडून सुनील मोरे, अमोल मुजुमदार, कुरुविला, संजय मांजरेकर, म्हांबरे, दिघे यांचा समावेश होता.

त्या सामन्यात त्यावेळच्या बॉम्बे संघाने पहिल्या डावात 573 धावांचा डोंगर उभा केला होता तो अमोल मुजुमदार चे दमदार द्विशतक 220, सुनील मोरे 166,दिघे 69 यांनी केलेल्या दमदार प्रदर्शनाने. महाराष्ट्र संघ पहिल्या डावात सर्वबाद 361 धावाच करू शकला होता ज्यात शंतनु सुगवेकर 160,सुनील गुदगे 55, हृषिकेश कानिटकर 44 धावा केले होते.
मुंबई ने त्यांच्या दुसऱ्या डावात 3/123 धावा केलेल्या. अनिर्णीत राहिलेल्या ह्या सामन्यात सुनील गुदगे व पारस म्हांबरें यांनी 5 बळी घेतले होते.

पुढील वर्षाच्या अगदी सुरुवातीलाच रणजी स्पर्धेतील पहिलाच सामना सोलापूरात होत असल्याने सोलापुरातील खेळाडूंमध्ये आनंदाचे तसेच उत्सुकतेचे वातावरण असून महाराष्ट्र संघातील प्रतिभावान खेळाडूंचा खेळ पाहायला मिळणार असून त्यात ऋतुराज गायकवाड, केदार जाधव, अंकित बावणे, अझीम काझी, राजवर्धन हांगरकेकर यांचा खेळ साक्षात पाहता येणार आहे.

त्यामानाने मणिपूर संघ कमजोर असला तरी ते महाराष्ट्राच्या संघासमोर त्यांचे प्रदर्शन कसे करतील हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.
यापूर्वी या दोन्ही संघात रणजी स्पर्धेत कधीच सामना झालेला नाहीये. मागील वर्षी मणिपूर संघ प्लेट गटात होता व त्यात साखळी फेरीत 3 सामने जिंकून अंतिम सामन्यात त्यांना बिहार कडून पराभव स्वीकारावा लागला होता.

तर दुसरीकडे महाराष्ट्र संघाने Elite B गटात साखळी 7 सामन्यात 3 विजय मिळविले होते.
तर यावर्षी महाराष्ट्र विरुद्ध मणिपूर यांच्यात नुकताच विजय हजारे या मर्यादित षटकांच्या स्पर्धेत सामना झाला होता व त्यात महाराष्ट्राने तब्बल 167 धावांनी सामना जिंकला होता तो 427 धावांचा डोंगर रचत.
सध्या विजय हजारे स्पर्धेनंतर महाराष्ट्राच्या संघाचे सराव शिबिर पुणे येथे चालू असून त्यातून महाराष्ट्राचा संघ लवकरच निवडला जाणार आहे.

Tags: Park stediumSolapur cricket
SendShareTweetSend
Previous Post

दिपक आबांच्या अध्यक्षतेखाली अजिदादांच्या राष्ट्रवादीची पहिली बैठक मंगळवारी

Next Post

देशात आज रविवारी राष्ट्रीय दुखवटा ; कुणाचे झाले निधन वाचा हि बातमी

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
देशात आज रविवारी राष्ट्रीय दुखवटा ; कुणाचे झाले निधन वाचा हि बातमी

देशात आज रविवारी राष्ट्रीय दुखवटा ; कुणाचे झाले निधन वाचा हि बातमी

ताज्या बातम्या

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकींग : तब्बल एक लाखाची लाच घेताना उत्तर सोलापूरचा मंडळ अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

13 July 2026
‘पाणी आवर्तन’ वरून खासदार प्रणिती शिंदे अन् आमदार देवेंद्र कोठे यांच्यात शाब्दिक !

‘पाणी आवर्तन’ वरून खासदार प्रणिती शिंदे अन् आमदार देवेंद्र कोठे यांच्यात शाब्दिक !

12 July 2026
मंजूर रस्ता कणबसचा… काम मात्र शिरवळच्या रस्त्यावर! मातोश्री योजनेत ‘लोकेशन गेम’चा गंभीर आरोप, सुलेर जवळगे ग्रामपंचायतचा गंभीर प्रकार उघड

मंजूर रस्ता कणबसचा… काम मात्र शिरवळच्या रस्त्यावर! मातोश्री योजनेत ‘लोकेशन गेम’चा गंभीर आरोप, सुलेर जवळगे ग्रामपंचायतचा गंभीर प्रकार उघड

8 July 2026
सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात

30 June 2026
सोलापूरच्या आमदारांनी विडी कामगायांच्या घरात बसून ऐकली ‘मन की बात’

सोलापूरच्या आमदारांनी विडी कामगायांच्या घरात बसून ऐकली ‘मन की बात’

28 June 2026
अय्यो ! सोलापूर विमानतळ येथे नाईट लँडिंगला म्हणे सिद्धेश्वर कारखान्याच्या आणखी एक चिमणीचा अडथळा ; जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत काय चर्चा झाली

अय्यो ! सोलापूर विमानतळ येथे नाईट लँडिंगला म्हणे सिद्धेश्वर कारखान्याच्या आणखी एक चिमणीचा अडथळा ; जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत काय चर्चा झाली

26 June 2026
धैर्यशील मोहितेंनी दाखवलेल्या ‘रेकॉर्डिंग गॉगल’ची चर्चा ; तसा गॉगल कोण लावला होता?

धैर्यशील मोहितेंनी दाखवलेल्या ‘रेकॉर्डिंग गॉगल’ची चर्चा ; तसा गॉगल कोण लावला होता?

19 June 2026
“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

18 June 2026

क्राईम

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकींग : तब्बल एक लाखाची लाच घेताना उत्तर सोलापूरचा मंडळ अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
13 July 2026
0

ब्रेकींग : तब्बल एक लाखाची लाच घेताना उत्तर सोलापूरचा मंडळ अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात जप्त केलेला मुरूम वाहतूक करणारा ट्रक...

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
30 June 2026
0

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : निवृत्त कर्मचाऱ्यांचे पेन्शन, फंड व इतर शासकीय रकमा...

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

by प्रशांत कटारे
18 June 2026
0

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या सोलापूर : भविष्य निर्वाह...

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

by प्रशांत कटारे
12 June 2026
0

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

Our Visitor

1990242
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group