सोलापूर -शाळेचा पहिला दिवसी शाळेत आलेल्या मुलांना आज आश्चर्याचा सुखद धक्का देत सिईओ स्वामी यांनी गुलाब फुले देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत केले. मोहोळ तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिंचोलीकाटी या शाळेस आज या शाळेच्या पहिल्या दिवशी “शाळा प्रवेशोत्सव” कार्यक्रम साजरा करण्यात आला.
सदर कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, शिक्षणाधिकारी संजय जावीर, मोहोळ पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आनंदकुमार मिरगणे, मुख्यालयाचे शिक्षण विस्तार अधिकारी स्वाती स्वामी, सरपंच, उपसरपंच, माजी सरपंच, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष इतर प्मान्यवर उपस्थित होते.
प्रथमता इयत्ता 1 ली विद्यार्थ्यांचं औक्षण करून स्वागत करण्यात आले. सर्व पहिलीच्या दाखल पात्र विद्यार्थ्यांना फेटा बांधून गुलाबाचे पाकळ्याने स्वागत करण्यात आले. शिवाय सर्व विद्यार्थ्यांना गणवेश, पाठ्यपुस्तक व स्कूल बॅग चे वितरण मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते करणेत आले. या प्रसंगी प्रत्येक विद्यार्थ्यांना एक वही भेट देण्यात आली. सर्व कार्यक्रम पाहून पहिलीचे विद्यार्थी खूप आनंदी दिसून येत होते.
जिल्हा परिषद शाळांकडे पालकांचा ओढा – सिईओ दिलीप स्वामी
जिल्हा परिषदेच्या शाळा मध्ये राबविलेल्या विविध नाविण्यपुर्ण उपक्रमामुळे जिल्हयात जिल्हा परिषद प्राथमिक शाळांकडे पालकांचा कल वाढत आहेत. जिल्हा परिषदे मध्ये गुणवत्ता पुर्ण शिक्षण व चांगल्या सुविधा मिळत आहेत. असेही सिईओ दिलीप स्वामी यांनी सांगितले. शिक्षण क्षेत्रात सोलापरू जिल्हा परिषदेने चांगले काम केले आहे. दशसुत्री उपक्रम, तसेच स्वच्छ सुंदर शाळा, माझे मुलं माझी जबाबदारी यामुळे शैक्षणिक, सास्कृतिक व सामाजिक दृष्ट्या चांगले परिणाम समोर येत आहेत.
सिईओ स्वानी पुढे म्हणाले, एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना आपल्या भाषणातून या चिंचोलीकाटी शाळेतून तयार होणारे विद्यार्थी हे देशाची भवितव्य आहेत. त्यामुळे पुढील भविष्यात आता शिकत असलेले विद्यार्थी हे देशात व राज्यात विविध विभागात मोठ्या पदावर काम करणारे विद्यार्थी तयार झाले पाहिजेत. अशा पद्धतीने विद्यार्थी घडवावेत असे आवाहन सर्व शिक्षकांना करण्यात आले.
चिंचोलीकटी शाळेस ग्रामस्थांनी व लोकप्रतिनिधींनी यापुढील भविष्य काळात असेच पद्धतीचे सहकार्य करावेत व आपल्या गावाचे उज्वल भविष्य आपणच घडवावेत असेही आपल्या भाषणात नमूद केले.


















