सोलापूर : युवा उद्योजक युवराज राठोड यांच्या सोनाई फाउंडेशनच्या वतीने रविवारी 17 डिसेंबर रोजी नुकत्याच निवडी झालेल्या सहा मान्यवरांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आलेला आहे.
जुळे सोलापुरातील कुसुमराज मल्टीपर्पज हॉल बिलाल नगर या ठिकाणी हा कार्यक्रम सायंकाळी सात वाजता होणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नूतन शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार, नूतन कार्याध्यक्ष जुबेर बागवान, एम के फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महादेव कोगनुरे, भारतीय जनता पार्टी ओबीसी सेलचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश पाटील, भाजप अनुसूचित जाती जमाती प्रदेश कार्यकारणी सदस्य राजश्री चव्हाण, राज्य पत्रकार संघातर्फे यशस्वी उद्योजक पुरस्कार मिळालेले गणेश कोळी या मान्यवरांच्या नागरी सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.