सोलापूर : कुमठा नाका परिसरातील संजय नगर येथे राहणारा किर्तीपाल फडतरे वय 29 या युवकाचे गुरुवारी रात्रीच्या सुमारास आकस्मित निधन झाले. किर्तीपालच्या पश्चात पत्नी, एक मुलगी, आई वडील असा परिवार आहे. आज शुक्रवारी सकाळी अकरा वाजता त्याच्या राहत्या घरापासून अंत्ययात्रा निघणार असून मोदी स्मशान भूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती मित्रांकडून मिळाली.
दरम्यान किर्तीपाल फडतरे यांच्या मृत्यूनंतर मित्र परिवाराकडून सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहण्यात येऊन शोक व्यक्त करण्यात येत आहे.


















