सोलापूर : सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची महापालिका प्रशासनाने चिमणी पाडल्यानंतर सोलापुरात सर्वत्र या चिमणीची चर्चा ऐकण्यास मिळत आहे. गुरुवारी चिमणी पडल्यानंतर शुक्रवारी काडादी यांच्या गंगा निवास या बंगल्यात सर्वपक्षीय नेते कार्यकर्त्यांनी त्यांच्या समर्थनार्थ मोठी गर्दी केली होती.
याचवेळी काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष विजयकुमार हत्तुरे यांनीही काडादी यांची भेट घेऊन त्यांना समर्थन दिले. त्याचवेळी हत्तूरे यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना फोन लावून दिला. तेव्हा पटोले यांनी काडादी साहेब काळजी करू नका, काँग्रेस पक्ष तुमच्या पाठीशी आहे. त्यांनी आज चिमनी पाडली, उद्या आपण त्यांना पाडू, मी येत्या 23 तारखेला सोलापुरात येत आहे, तुमची भेट घेईन या भाषेमध्ये समर्थन दिले. सध्या या फोनची सर्वत्र चर्चा ऐकण्यास मिळत आहे.

















