Friday, October 16, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

मंगळवेढ्यात या दादाच्या जयभवानीवर एक्साइजचा छापा ; दारुड्याणा पकडून पोलिसांचे झाले समाधान

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
16 December 2023
in solapur
0
मंगळवेढ्यात या दादाच्या जयभवानीवर एक्साइजचा छापा ; दारुड्याणा पकडून पोलिसांचे झाले समाधान
0
SHARES
1.2k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

राज्य उत्पादन शुल्क माळशिरस विभागाच्या पथकाने गुरुवारी मंगळवेढा शहरातील दोन धाब्यांवर टाकलेल्या धाडीत  न्यायालयाने दोन हॉटेल चालकासह नऊ मद्यपी ग्राहकांना चौपन हजार पाचशे रुपयांचा दंड ठोठावला. तसेच मंगळवेढा-मरवडे रोडवर एका चारचाकी वाहनातून विदेशी दारुच्या वाहतूकीचा गुन्हाही दाखल करण्यात आला.

सविस्तर वृत्त असे की, गुरुवारी (ता. 14 डिसेंबर) रात्री नऊ वाजेच्या सुमारास राज्य उत्पादन शुल्क माळशिरस विभागाच्या पथकाचे निरिक्षक संदिप कदम यांनी मंगळवेढा शहराच्या हद्दीतील होटेल जयभवानी या ढाब्यावर छापा टाकला असता ढाबा मालक कुमार दादा सावंत हा ग्राहकांना मद्य पिण्याची व्यवस्था उपलब्ध करुन देत असतांना आढळून आल्याने त्याचेसह 5 मद्यपी ग्राहक समाधान किसन खवणकर, आप्पासो सिद्धेश्वर जाधव, सोमनाथ अशोक जाधव, आप्पा जायप्पा मोरे व सुनिल बाबूलाल वर्मा यांना अटक करण्यात आली.

एका अन्य कारवाईत दुय्यम निरिक्षक सांगोला कैलास छत्रे यांच्या पथकाने मंगळवेढा शहराच्या हद्दीतील होटेल भैरवनाथ या ठिकाणी छापा टाकून होटेल मालक शुभम सुखदेव जोध व मद्यपी ग्राहक अनिल शेषेराव जाधव, दिपक हरी जाधव, दिपक रामा लोंढे व महेश अरविंद बोरकडे यांना अटक केली. दोन्ही गुन्ह्यातील तपास अधिका-यांनी एकाच दिवसात तपास पूर्ण करून आरोपपत्र न्यायालयात सादर केले असता मा. न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग, मंगळवेढा श्रीमती एस.एन. गंगवाल शाह यांनी हॉटेल मालकांना प्रत्येकी पंचवीस हजार रुपये दंड व मद्यपी ग्राहकांना प्रत्येकी पाचशे रुपये दंड अशी शिक्षा सुनावली.

याच पथकाने शुक्रवारी दुपारच्या सुमारास मंगळावेढा-मरवडे रोडवर प्रशांत शंकर भगरे, वय 26 वर्षे, रा. भोसे ता. मंगळवेढा हा त्याच्या मारुती व्हॅन क्र. MH13 DE 3438 मधून विदेशी दारुची वाहतूक करतांना आढळून आल्याने त्याला ताब्यात घेऊन त्याचेविरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. त्याच्या ताब्यातून विदेशी मद्याच्या 180 मिली क्षमतेच्या इंपेरियल ब्ल्यू व्हिस्कीच्या 48 बाटल्या, मॅकडॉवेल नंबर वन व्हिस्कीच्या 48 बाटल्या व रॉयल स्टॅग व्हिस्कीच्या 22 बाटल्या व वाहन असा एकूण एक लाख त्रेचाळीस हजार आठशे चौ-यांशी किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक गुणाजी क्षीरसागर, निरिक्षक संदिप कदम, कैलास छत्रे, राजेंद्र वाकडे, सहायक दुय्यम निरिक्षक आवेज शेख, जवान गजानन जाधव, तानाजी काळे, तानाजी जाधव व वाहनचालक मारुती जडगे यांच्या पथकाने पार पाडली.

Tags: Solapur redराज्य उत्पादन शुल्क
SendShareTweetSend
Previous Post

#ललित_पाटील प्रकरणात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अधिवेशनात महत्वाची माहिती

Next Post

सोलापूर भाजप उत्तर भारतीय आघाडीच्या अध्यक्षपदी आनंद शर्मा ; 36 जणांची जंबो कार्यकारिणी

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
सोलापूर भाजप उत्तर भारतीय आघाडीच्या अध्यक्षपदी आनंद शर्मा ; 36 जणांची जंबो कार्यकारिणी

सोलापूर भाजप उत्तर भारतीय आघाडीच्या अध्यक्षपदी आनंद शर्मा ; 36 जणांची जंबो कार्यकारिणी

ताज्या बातम्या

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

4 October 2026
महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

2 October 2026
गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026

क्राईम

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

by प्रशांत कटारे
4 October 2026
0

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू सोलापूर : शहरातील रंगभवन चौकात आज, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री...

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

Our Visitor

2002497
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group