सोलापूर : राज्याच्या आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी यंदाच्या आषाढी एकादशीनिमित्त वारकरी भक्तांच्या सेवेसाठी महाआरोग्य शिबिराचे आयोजन केले आहे. सोलापूर जिल्हा परिषदेच्या जिल्हा आरोग्य अधिकारी पदाचा कार्यभार सध्या डॉक्टर सोनिया बागडे यांच्याकडे अतिरिक्त देण्यात आला आहे.
या महाआरोग्य शिबिरासाठी विशेष करून जिल्हा आरोग्य अधिकारी पदाचा तात्पुरता आषाढी वारीसाठी धुळे जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर संतोष नवले यांच्याकडे देण्यात आला आहे. 19 जून रोजी सार्वजनिक आरोग्य विभागाने डॉक्टर नवले यांची ऑर्डर काढली.
त्या ऑर्डरमध्ये, नमूद शासन परिपत्रकातील मार्गदर्शक सूचनेनुसार डॉ. संतोष गोविंद नवले. जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, धुळे यांना जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, सोलापूर या पदाचा कार्यभार आषाढी वारीमध्ये महाआरोग्य शिबीराचे कामकाज करीता अत्यावश्यक बाब म्हणून पुढील आदेशापर्यंत सोपविण्यात येत आहे.
तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, धुळे या पदाचा अतिरिक्त कार्यभार डॉ. देवेंद्र रामराव जायभायें, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, धुळे यांना सोपविण्यात येत आहे.. संबंधित अधिका-यांनी त्यांचे विहित कार्यालयांत हजर होवून तत्संबंधीचा अनुपालन अहवाल सर्व संबंधितांना सादर करावा.
देशाच्या पंतप्रधानांपासून राज्याच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत दाढीवाल्यांची चर्चा आहे त्यामुळे आता सोलापूर जिल्हा परिषदेचा आरोग्य अधिकारी सुद्धा दाढीवाला म्हणून चर्चा तर झालीच पाहिजे.



















